गॅस तुटवड्यावरून लोकसभेत वातावरण तापलं; देशात CNG, LPG गॅसची स्थिती काय? केंद्रीय मंत्री हरदीप पुरींनी सगळं सांगितलं

India gas supply issue : गॅस तुटवड्यावरून लोकसभेत वातावरण तापलं आहे. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी देशातील CNG, LPG गॅसची स्थितीविषयी सविस्तर माहिती दिली.

गॅस तुटवड्यावर लोकसभेत चर्चा सुरू झाली आहे. देशातील गॅस तुटवड्यावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. सत्ताधाऱ्यांच्या टीकेला मंत्री पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी प्रत्युत्तर दिलं. हरदीप पुरी यांनी सांगितलं की, 'भारतात तेलाचा पुरवठा सुरक्षितरित्या होत आहे. होर्मुजमधून केवळ २० टक्के दळणवळण प्रभावित झालं आहे. देशात गॅसचा पर्यायी साठा आहे. गॅस तुटवड्यावर चिंता करण्याची गरज आहे'.

'डीजल-पेट्रोल आणि गॅस सिलिंडरचा कोणताही तुटवडा नाही. एलएनजी कार्गो दररोज येत आहेत. ते दुसऱ्या मार्गाने येत आहे. सीएनजी पुरवठा १०० टक्के होत आहे. कॅनडा, नॉर्वे, रशिया या मार्गातून इंधन पुरवठा होत आहे, असे केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com