SBI Jobs: स्टेट बँकेत ऑफिसर होण्याची संधी; १५० रिक्त जागा; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

SBI Recruitment 2025: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. स्टेट बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.
SBI Job
SBI JobSaam Tv
Published On

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. स्टेट बँकेत अधिकारी होण्याची ही उत्तम संधी आहे. स्टेट बँकेच्या या भरतीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी तुम्ही sbi.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. (SBI Recruitment 2025)

SBI Job
Anganwadi Jobs: परीक्षा न देता सरकारी नोकरीची संधी! अंगणवाडी पर्यवेक्षक पदासाठी ४०,००० रिक्त जागा; अर्ज कसा कराल?

स्टेट बँकेने या नोकरीबाबत अधिसूचना जाहीर केली आहे. या भरती मोहिमेत १५० रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जानेवारी २०२५ आहे. या भरतीमध्ये ट्रेड फायनान्स ऑफिसर पदासाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २३ ते ३२ वयोगटातील असावे. (SBI Jobs)

स्टेट बँकेने या नोकरीबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारानी लवकरात लवकर अर्ज करावेत.

SBI Job
Anganwadi Jobs: परीक्षा न देता सरकारी नोकरीची संधी! अंगणवाडी पर्यवेक्षक पदासाठी ४०,००० रिक्त जागा; अर्ज कसा कराल?

अर्ज कसा करावा?

या नोकरीसाठी तुम्ही sbi.co.in या वेबसाइटवर जावे लागेल.

त्यानंतर होमपेजवर करिअर ऑप्शनवरक्लि करा.

यानंतर तिथे एसबीआय एससीओ भरती २०२५ असेल त्यावर क्लिक करा.

यानंतर तुम्ही संबंधित लिंकवर क्लिक करा.

त्यानंतर अर्जप्रक्रिया पूर्ण करुन फॉर्म सबमिट करा.

या फॉर्मची हार्ड कॉपी तुमच्याजवळ ठेवा.

या नोकरीसाठ उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या आधारे होणार आहे. १०० गुणांचा इंटरव्ह्यू होणार आहे. त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

SBI Job
Government Job: महिला व बालविकास विभागात नोकरीची संधी; पात्रता पदवीधर; अशा पद्धतीने करा अर्ज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com