NABARD Job Saam Tv
naukri-job-news

NABARD Recruitment: नाबार्डमध्ये सरकारी नोकरीची संधी; १६२ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

NABARD Development Assistant Recruitment 2026: नाबार्डमध्ये सरकारी नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. नाबार्डमध्ये सध्या डेव्हपलमेंट असिस्टंट पदासाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

सरकारी बँकेत नोकरीची संधी

नाबार्डमध्ये रती सुरु

डेव्हलपमेंट असिस्टंट पदासाठी भरती सुरु

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँकेत सरकारी नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. नाबार्डमध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रीय कृषी आणि विकास बँकेस सध्या ग्रुप बी डेव्हलपमेंट असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सरु झाली आहे.

नाबार्डमधील डेव्हलपमेंट असिस्टंट पदासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. अर्जप्रक्रिया १७ जानेवारी २०२६ पासून सरु झाली आहे. या भरती मोहिमेत ग्रुप बी डेव्हलपमेंट असिस्टंट आणि डेव्हलपमेंट असिस्टंट (हिंदी) या पदांसाठी ही भरती होणार आहे. एकूण १६२ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. तुम्ही या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

नाबार्डमधील या नोकरीसाठी तुम्ही www.nabard.org या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ फेब्रुवारी २०२६ असणार आहे. २१ ते ३५ वयोगटातील उमेदवारांनी या नोकरीसाठी अर्ज करायचा आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड प्रिलियम्स, मेन्स, लँग्वेज प्रोफेशियंसी टेस्टद्वारे होणार आहे.

शैक्षणिक पात्रता

डेव्हलपमेंट असिस्ंटट पदासाठी उमेदवारांनी डिग्री प्राप्त केलेली असावी. डेव्हलपमेंट असिस्टंट (हिंदी) पदासाठी इंग्रजी किंवा हिंदी माध्यमातून पदवी प्राप्त केलेली असावी. त्यांनी या कोर्समध्ये हिंदी किंवा इंग्रजी विषयाचा अभ्यास केलेले असावा.

अर्ज कसा करावा?

सर्वात आधी www.nabard.org या वेबसाइटवर जा.

यानंतर करिअर नोटीसवर क्लिक करा.

यानंतर Click Here for New Registration वर क्लिक करा.

यानंतर रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन केल्यावर पुन्हा वेबसाइटवर लॉग इन करा.

यानंतर तुम्हाला Development Assistant भरती असा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.

यानंतर तुम्ही सर्व माहिती भरा आणि अर्ज सबमिट करा.

या अर्जाची प्रिंट आउट तुम्ही तुमच्याजवळ ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बारामतीत कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी...; आज प्रदर्शनाचा दुसरा दिवस

Trendy Hairstyle: पार्टी, फंक्शनसाठी साडीवर करा 'या' ट्रेंडी आणि सुंदर हेअरस्टाईल

Accident News: रंगरंगोटीचे काम करून जेवणाला बसले अन्...; भरधाव कारनं २० मजुरांना चिरडलं, २ जणांचा मृत्यू

निवडणुकीनंतर रुपाली पाटील ठोंबरेंची प्रकृती अस्वस्थ; पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल

Cold And Cough: थंडीत सर्दी- खोकला अन् तापाच्या समस्या वाढतायेत? मग आत्ताच 'हे' पदार्थ खाणं टाळा

SCROLL FOR NEXT