

रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी
३१२ पदांसाठी भरती
मिळणार पगार ४४,९०० रुपये
सरकारी नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतु सरकारी नोकरीच्या भरतीबद्दल अनेकदा योग्य माहिती मिळत नसल्याने अनेकजण या संधीपासून राहतात. तुम्हालाही सरकारी नोकरी करायची असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रेल्वे भरती बोर्डाने नुकतीच आयसोलेटेड कॅटेगरीसाठी भरती जाहीर केली आहे.
रेल्वेने एकूण ३१२ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे ज्युनिअर ट्रान्सलेटर, चीफ लॉ असिस्टंट, स्टाफ अँड वेलफेअर इन्स्पेक्टरसह अनेक पदभरती केली जाणार आहे. या नोकरीसाठीची भरतीप्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२६ आहे.
रेल्वे भरती मोहिमेत सर्वाधिक पदे ही ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर पदासाठी आहे. २०२ जागांसाठी ही भरती होणार आहे. याचसोबत चीफ लॉ असिस्टंटसाठी २२ जागा, पब्लिक प्रोसिक्युशनसाठी ७ जागा, सीनियर पब्लिक इन्स्पेक्टरसाठी १५ जागा, स्टाफ अँड वेलफेअर इन्स्पेक्टर पदासाठी २४ जागा ठेवण्यात आल्या आहेत.
रेल्वेतील या भरती मोहिमेत पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे. ३० ते ४० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
पगार
रेल्वेतील या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला चांगला पगार मिळणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना ३५,४०० रुपये पगार मिळणार आहे. चीफ लॉ असिस्टंट अशा पदांसाठी ४४,९०० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत महागाई भत्ता, भाडे भत्ता अशा अनेक गोष्टींचा लाभ मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.