

मुंबई लोकल ट्रेनमधील गर्दी कमी होण्याची शक्यता
मुंबई लोकल ट्रेन लवकरच १८ डब्यांची होणार
रेल्वेच्या निर्णयाने प्रवाशांना दिलासा मिळणार
मुंबई लोकल ट्रेनमध्ये दिवसेंदिवस प्रवाशांची संख्येत भर पडू लागली आहे. पीक अवर्समध्ये प्रवाशांना ट्रेनमध्ये नीट पाय ठेवायला जागा नसते. लोकल ट्रेनच्या गर्दीतूनच प्रवाशांना सकाळी कार्यालय गाठावं लागतं. मागील काही वर्षांत या लोकल गर्दीने अनेक बळी घेतले आहेत. याच लोकल ट्रेनच्या वाढत्या गर्दीवर रेल्वेने नव्याने एक उपाय शोधून काढला आहे. रेल्वेच्या या नव्या निर्णयाने प्रवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, पश्चिम रेल्वेने ट्रेनच्या डब्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेकडून जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात १८ डब्यांच्या ट्रेनची ट्रायल होणार आहे. सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर १५ डब्यांची लोकल ट्रेन धावत आहेत. दोन्ही मार्गावरून दिवसभारत ३००० हून अधिक लोकल ट्रेनच्या सेवा दिल्या जात आहेत. या ट्रेनमधून ७५ लाख प्रवासी प्रवास करतात.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील विरार-दहाणू रोड या मार्गावरून १८ डब्यांच्या ट्रेनच्या दोन लोकल ट्रेनची चाचणी अनुक्रमे १४ आणि १५ जानेवारी रोजी होणार आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या चाचणीदरम्यान दोन प्रमुख बाबी तपासल्या जाणार आहेत. ते म्हणजे इमरजेन्सी ब्रेकिंग डिस्टेन्स आणि कपलर फोर्स.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आपात्कालीन स्थितीत ट्रेन कोणत्या अंतरावर थांबेल. सीएफ चाचणीदरम्याण ब्रेक मारल्यानंतर ट्रेनच्या डब्ब्यांना जोडणारा कपलरवर पडणाऱ्या दाबाचा अभ्यास केलं जातं. दोन्ही चाचण्या नव्या ट्रेनच्या सेवा सुरू करण्याआधी केली जाते.
पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार, दोन्ही ट्रायल वेगवेगळ्या १८ डब्यांच्या लोकल ट्रेनची केली जाणार आहे. एका ट्रेनमध्ये बॉम्बिर्डियर कंपनीचे विद्युत उपकरण असेल. तर दुसऱ्या ट्रेनमध्ये मे सर्व्हे ड्राइव्हसची विद्युत सिस्टम कमी होईल. बॉम्बार्डियर सिस्टमच्या ट्रेनची चाचणी ११० किलोमीटर प्रति तासांहून अधिक गतीवर केली जाणार आहे. मेधा विद्य्युत सीस्टमच्या ट्रेनची चाचणी १०५ किलोमीटर प्रती तासाच्या वेगाने होईल. त्यामुळे या चाचण्यानंतर लवकरच मुंबईतील काही भागात १८ डब्यांची लोकल ट्रेन धावताना दिसेल, अशी शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.