'अंडरवेअर'ने घोळ केला, सत्ताधारी आमदार तुरूंगात गेला; खुर्चीही गमावली , नेमकं काय घडलं?

kerala underwear case update : एका 'अंडरवेअर'मुळे आमदाराला ३ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
kerala mla
kerala politics Saam tv
Published On
Summary

आमदार एंटनी राजू यांना कोर्टाने सुनावली शिक्षा

आमदार राजू यांना 'अंडरवेअर ड्रग्स' प्रकरणात तीन वर्षांची शिक्षा

त्यांनी ३ दशकापूर्वी ज्युनिअर वकील म्हणून केस लढवली होती

केरळचे माजी मंत्री आणि सत्ताधारी डावी आघाडी एलडीएफचे आमदार एंटनी राजू यांना २५ वर्ष जुन्या प्रकरणात कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. केरळच्या नेडुमंगाजडच्या दंडधिकारी कोर्टाने 'अंडरवेअर ड्रग्स' प्रकरणात तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. राजू यांनी १९९० साली ज्युनिअर वकील म्हणून केस लढवली होती. केस लढताना त्यांनी पुराव्यांशी छेडछाड केली होती.

'अंडरवेअर ड्रग्स' प्रकरणात तीन वर्षांची शिक्षा मिळाल्याने एंटनी राजू यांची आमदारकी जाणार आहे. त्यांना निवडणूक देखील लढवता येणार नाही. ९०च्या दशकातील या प्रकरणामुळे एंटनी राजू यांचं राजकीय करिअर उद्ध्वस्त झालं आहे. त्यांनी वरील न्यायायलयात दाद मागण्यासाठी एक महिन्याचा अवधी देण्यात आला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

ऑस्ट्रेलियाचा नागरिक अँड्र्यू साल्वाटोर सर्वेली याला तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली होती. साल्वटोर याने निळ्या रंगाची अंडरवेअर घातली होती. याच अंडरवेअरमध्ये ६१.५ ग्रॅम ड्रग्स लपवले होते. या प्रकरणात दोषीला तीन ते पाच वर्षांची शिक्षा होते. परंतु या प्रकरणाने वेगळंच वळण घेतलं. साल्वाटोर यांचं प्रकरण लढण्याची जबाबदारी ज्युनिअर वकील एंटनी राजू यांना मिळाली होती.

kerala mla
मुंबईत आणखी एका उमेदवारावर हल्ला; डोकं फुटलं, राजकीय वर्तुळात खळबळ

कायदे प्रक्रियेनुसार आरोपीच्या अंडरवेअरमधीर ड्रग्स जप्त केले होते. त्यामुळे आरोपीविरोधात भक्कम पुरावे होते. याच पुराव्याच्या आधारे आरोपीला १० वर्षांची शिक्षा सुनावली आणि १ लाखांचा गंड ठोठावला.

कोर्टाच्या निर्णयाविरोधात आरोपी सर्वेली याने हायकोर्टात आव्हान दिलं. पुढे या प्रकरणात वकील एंटनी राजू यांच्याविरोधात पुराव्याशी छेडछाड केल्याचा आरोप झाला. सर्वेली यांच्या वकिलांच्या टीमने दावा केला की, ज्या अंडरवेअरमध्ये ड्रग्स सापडले. ती सर्वेलीची नाहीच. त्याला अंडरवेअर देखील येत नाही. त्यानंतर प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं. बचाव पक्षाने सर्वेलीला सर्वांसमोर अंडरवेअर घालण्यास सांगितली. ही अंडरवेअर सर्वेलीला व्यवस्थित आली नाही. त्यानंतर आरोपी सर्वेली याला दोष मुक्त करण्यात आलं.

एंटनी राजू कसे अडकले?

अंडरवेअर ड्रग्स प्रकरणात वकील राजू यांच्या अडचणी वाढल्या. या प्रकरणा दुसरा आरोपी वेस्ली जॉन-पॉल याने नवनवीन खुलासे केले. या प्रकरणात ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल सेंट्रल ब्यूरोने केरळ हायकोर्टाला धक्कादायक माहिती दिली. तपास अधिकाऱ्याने माहिती दिली की, ड्रग्स प्रकरणात अंडरवेअरशी छेडछाड झाली. आरोपी पॉलने सांगितलं की, सर्वेलीच्या दाव्यानुसार, भारतात जाऊन अंडरवेअरची साइज छोटी केली. वकील एंटनी यांच्यावर आरोप करण्यात आला की, त्यांनी हेतूपर्वक अंडरवेअरमध्ये बदल केला.

kerala mla
Ladki Bahin Yojana : 3 हजारांच्या ऐवजी १५०० रुपये मिळाले, आता डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? महत्वाची माहिती समोर

राजू यांच्या आरोप झाल्यानंतर १९९४ साली त्यांच्यासहित कोर्टात काम करणाऱ्या क्लार्कच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात १२ वर्षांनी चार्जशीट फाईल झाली. हायकोर्टात राजू यांच्याविरुद्ध कार्यवाही रद्द करण्यात आली होती.यावेळी पोलीस अहवालाच्या आधारे कनिष्ठ न्यायालये गुन्ह्याची दखल घेऊ शकत नाही. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले. त्यानंतर हे प्रकरण पुन्हा सुरू झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com