Success Story: फुटपाथवर आईने कष्ट केले, पोरानं आज वर्दी चढवली! नोकरी लागताच गोपाळ आईपुढे नतमस्तक; काळजाला भिडणारा व्हिडिओ

CRPF Gopal sawant: भाजी विकून मुलाला शिकवणाऱ्या आईच्या कष्टांना यशाचं सोनं मिळालं. पिंगुळीच्या गोपाळ सावंत यांची CRPF मध्ये निवड; भावूक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
Inspirational Mother Son Story
CRPF Selection Viral Video google
Published On

सोशल मीडियावर सध्या सतत सेंकदात घडणाऱ्या घटना प्रत्येक कानाकोपऱ्यात सहज पोहोचतात. त्यात कोणाच्या दु:खाच्या घटना, एखाद्या ठिकाणी झालेला अपघात, आनंदाच्या बातम्या, मिळालेलं पद, किंवा एखादी कोणी एखादी नवी खरेदी केलेली गाडी या सगळ्या गोष्टी लाखो लोकांपर्यंत पोहोचतात. त्यातच एका आईने तीच्या लेकराला भाजी विकून शिकवून त्याचं केंद्रीय राखीव पोलीस दल(CRPF)मध्ये जाण्याचं स्वप्न पुर्ण केलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावातल्या मगोपाळ सावंत यांची केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये निवड झाली आहे. हा आनंदाचा क्षण सध्या सोशल मीडियावर सर्वांचे डोळे पाणावणारा ठरत आहे. यामध्ये या यशाची सर्वात भावूक बाब म्हणजे गोपाळने ही आनंदाची बातमी कुडाळ नगरपंचायत परिसरातील फुटपाथवर भाजी विकणाऱ्या आईला दिली. व्हिडिओमध्ये दिसतं की, गोपाळ आणि त्याचे सहकारी गुलाल उधळत आनंद साजरा करत आईजवळ येतात. गोपाळ आईच्या पायावर डोकं ठेवतो, आणि त्या क्षणी आई-मुलाचे अश्रू अनावर होतात. अनेक वर्षांच्या कष्टांचं चीज झाल्याचा तो क्षण पाहून प्रत्येकाला अभिमान वाटतो.

Inspirational Mother Son Story
Bandhani Dress: बांधणीच्या ड्रेसच्या 'या' आहेत हटके डिझाइन्स, दिसाल सिंपल अन् आकर्षित

आईने भाजीचा व्यवसाय करत कुटुंबाचा गाडा ओढला. गरिबी, अडचणी, संघर्ष यावर मात करत तिने मुलाला शिकवलं, मोठं केलं. आज त्याच कष्टांना यशाचं सोनं लाभलं आहे. अशा सोशल मीडियावर अनेकांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत. “आईच्या कष्टाचं फळ मिळालं”, “आईचे ऋण फेडलं भावा”,“खूप नशीबवान आहे ही माऊली” अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.

गोपाळ सावंत यांची ही यशाची गोष्ट आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे, मेहनत, चिकाटी आणि आई-वडिलांचा आशीर्वाद यामुळे स्वप्नं नक्की पूर्ण होतात, याचा जिवंत पुरावा तुम्ही या व्हिडीओत पाहू शकता.

Inspirational Mother Son Story
Saturday Horoscpe: कामात बढतीचे योग अन् कौतुकाची थाप, ४ राशींसाठी भरभराटीचा दिवस; वाचा शनिवारचे राशीभविष्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com