Metro Jobs Saam Tv
naukri-job-news

Metro Jobs: मेट्रोत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; पगार २,८०,००० रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Maha Metro Recruitment: मेट्रोमध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. मेट्रोमध्ये सध्या विविध पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला भरघोस पगार मिळणार आहे.

Siddhi Hande

मेट्रोमध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने नोकरी जाहीर केली आहे. महाराष्ट्र मेट्रोने ज्युनिअर इंजिनियरसह अनेक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. एकूण १५१ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

मेट्रोमधील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ जुलै २०२५ आहे. इच्छुकांनी mahametro.org या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यानंतर कागदपत्रे संबधित कार्यालयात पाठवायची आहेत. (Maha Metro Recruitment)

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे. या नोकरीसाठी B.Arch, B.Tech, BE, CA किंवा ICWA पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड तीन प्रक्रियांमध्ये होणार आहे. सर्वात आधी इंटरव्ह्यू होणार आहे. त्यानंतर कागदपत्रे पडताळणी आणि त्यानंतर मेडिकल टेस्ट केली जाणार आहे. या तिन्ही प्रोसेस झाल्यानंतर उमेदवारांची नेमणूक केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ४०० रुपये शुल्क भरायचे आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरायचे आहे.

चीफ प्रोजेक्ट मॅनेजर (टेलिकॉम),चीफ प्रोजेक्ट मॅनेजर (इलेक्ट्रिकल), चीफ प्रोजेक्ट मॅनेजर (PSI)-E7,चीफ प्रोजेक्ट मॅनेजर (E&M) अशा विविध पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अनुभवी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ४०,००० ते २,८०,००० रुपये पगार मिळणार आहे.

अर्ज कसा करावा?

या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी mahametro.org या वेबसाइटवर जायचे आहे. याचसोबत ऑफलाइन पद्धतीनेही अर्ज करु शकतात. तुम्हाला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे नागपुर मेट्रो, नवी मुंबई मेट्रो, ठाणे इंटीग्रल मेट्रो प्रोजेक्ट, पुणे मेट्रो येथील कार्यालयांमध्ये पाठवायचे आहेत. याबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विश्वचषक विजेता कर्णधार भ्रष्टाचारात अडकला, कोणत्याही क्षणी अटक होणार? श्रीलंकेत वातावरण तापलं

Christmas Celebration : ख्रिसमस सेलिब्रेशन करायचे असेल तर, मुंबईतील माउंट मेरी चर्चला नक्कीच भेट द्या

Dhurandhar Collection : 'धुरंधर'ची ४०० कोटींकडे वाटचाल; 'छावा'चा रेकॉर्ड मोडणार? कपिलचा चित्रपट तिकीट खिडकीवर आपटला, वाचा कलेक्शन

Jio Recharge 2026: JIOने दिली खुशखबर! 2026 मध्ये रिचार्ज होणार स्वस्त, फक्त १०३ रुपयांपासून सुरुवात, वाचा संपूर्ण प्लान...

SAI Recruitment: स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; पगार २.०९ लाख रुपये; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT