BMC Jobs : मुंबई महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; महिन्याला पगार ३०,००० रुपये; कुठे अन् कसा अर्ज करणार? घ्या जाणून

BMC Recruitment 2025: मुंबई महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. या पदासाठी ३०००० रुपये महिना पगार असणार आहे. या पदासाठीची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
BMC Job
BMC JobSaam tv
Published On

मुंबई महापालिकेत नोकरी करु इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी हाती आली आहे. मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात ही नोकरीची संधी आहे. पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात 'Community Development Officer' या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी या पदांसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.

'Community Development Officer' या पदासाठी ५ जूनपासून अर्ज मागवण्यासही सुरुवात झाली आहे. एकूण २९ रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. पालिकेतील या पदांसाठी उमेदवारांना मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा लागणार आहे. ही सुवर्णसंधी समाजसेवा, शहरी विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये करिअर करु इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी उत्यंत उपयुक्त असणार आहे.

BMC Job
Tulja bhavani Temple : किरकोळ वाद टोकाला गेला; तुळजाभवानी मंदिरात दर्शन रांगेत भक्तांची फ्री स्टाइल हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

पालिकेतील या पदासाठी आवश्यक माहिती जाहीर करण्यात आली आहे. पालिकेतील या पदाचे नाव कम्युनिटी डेव्हलमेंट ऑफिसर असे आहे. या पदासाठी एकूण २९ जागा आहेत. मुंबई हेच नोकरीचं ठिकाण असणार आहे. पालिकेच्या या पदासाठी दरमहा ३०,००० रुपये वेतन देण्यात येणार आहे.

अर्जासाठी कालावधी काय?

कम्युनिटी डेव्हलमेंट ऑफिसर पदासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. स्वत: जाऊन आणि पोस्टाने या पदासाठी अर्ज भरू शकता. वयोमर्यदा किमान १८ वर्षे ते कमाल ४३ वर्षे इतकी आहे. कम्युनिटी डेव्हलमेंट ऑफिसर पदासाठी ५ जून २०२५ ते २५ जून २०२५ इतका कालावधी देण्यात आला आहे.

BMC Job
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंनी सस्पेन्स वाढवला; ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर केलं मोठं विधान, VIDEO

पात्रता आणि आवश्यक अटी काय?

शैक्षणिक पात्रता काय?

पदवीधर किंवा त्यास समक्षक पात्रता आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर समाजशास्त्र, नागरी प्रशासन, शहरी विकास, कम्युनिटी वर्क इत्यादी क्षेत्रातील पदवी किंवा डिप्लोमा धारकांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

अनुभव काय?

सामाजिक विकास प्रकल्प, स्थानिक समुदायांसोबत काम करण्याचा अनुभव असल्यास अधिक लाभदायक ठरणार आहे. त्याचबरोबर उमेदवार हा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असावा. त्याचबरोबर या उमेदवाराची मुंबईतील शहरी आणि उपनगरी भागांमध्ये काम करण्याची तयारी असावी.

BMC Job
Pandharpur News : विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद; मंदिर समितीचा निर्णय, कारण काय?

अर्ज कुठे पाठवाल?

उपमुख्य अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) कार्यकारी कार्यालय, मुंबई महानगरपालिका इमारत, ६ वा मजला, पंतनगर बेस्ट डेपोच्या मागे,पंतनगर महानगरपालिका यानगृह, घाटकोपर (पूर्व), मुंबई – ४०००७५ या पत्त्यावर अर्ज पाठवता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com