Tulja bhavani Temple : किरकोळ वाद टोकाला गेला; तुळजाभवानी मंदिरात दर्शन रांगेत भक्तांची फ्री स्टाइल हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

tulja bhavani devotees fight : किरकोळ वाद टोकाला गेल्यानंतर तुळजाभवानी मंदिरात दर्शनाच्या रांगेतील भक्तांची हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
tulja bhavani devotees fight News
tulja bhavani devotees fightSaam tv
Published On

बालाजी सुरवसे, साम टीव्ही

धाराशिव : तुळजाभवानीच्या मंदिरात रांगेत भक्तांमध्ये फ्री स्टाइल हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. किरकोळ वाद टोकाला जाऊन भक्तांमध्ये हाणामारी झाली. भक्तांच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फ्री स्टाइल हाणामारीनंतर भक्तांनी प्रशासनाच्या नियोजनावर बोट ठेवलं आहे.

धाराशिवात प्रसिद्ध तुळजाभवानी मंदिर आहे. याच तुळजाभवानी देवीला महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानले जाते. मात्र, देवीच्या चरणी माथा टेकायला आलेल्या भक्तांमध्येच हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. तुळजाभवानीच्या मंदिरात किरकोळ कारणातून भक्तांमध्ये वाद झाला. या वादानंतर भक्तांमध्ये फ्री स्टाइल हाणामारी झाली.

tulja bhavani devotees fight News
Shashank Singh : मला कानाखाली मारायला हवी होती; श्रेयस अय्यरच्या शिवीगाळीवर शशांकचा मोठा खुलासा

नेमकं काय घडलं?

तुळजाभवानीच्या मंदिरातील दर्शन रांगेत भक्तांमध्ये हाणामारी झाली. लहान मुलाने उलटी केल्याच्या कारणावरून महिला आणि पुरुषात हाणामारी झाली. मंदिराच्या दर्शन रांगेतील वाद १५ ते २० मिनिट सुरू होता. २० मिनिटानंतर दर्शन रांगेचे नियोजन करणारे सिक्युरिटी गार्ड घटनास्थळी पोहोचले. तुळजाभवानी मंदिरात रविवार सुट्टी असल्याने भाविकांची दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळाली.

tulja bhavani devotees fight News
BJP : निवडणुकीआधी भाजपला मोठा झटका; बड्या नेत्याने सोडली साथ

दुसरीकडे मंदिराच्या दर्शन रांगेतील फॅन बंद पडले आहेत. गर्दी आणि उकाडा सुरू असल्याने भाविकांमध्ये वाद वाढले आहेत. त्यात प्रशासनाकडून दर्शन रांगेच्या नियोजनात चूक होत असल्याचा भाविकांचा आरोप आहे.

tulja bhavani devotees fight News
Pandharpur News : विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद; मंदिर समितीचा निर्णय, कारण काय?

तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ सेवन करून थुंकण्यास मनाई

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिर आणि परिसरात तंबाखूजन्य पदार्थ सेवन करून थुंकण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. यामळे त्यामुळे मंदिर संस्थानच्या वतीने मंदिर आणि परिसरात तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्यांवर मंदीर बंदीची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत काही भाविकांनी संस्थानकडे तक्रार केल्या होत्या.

भाविकांनी, पुजाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी तंबाखूजन्य पदार्थ सेवन करून थुंकल्याचे निर्देशनात आल्यास कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. तर पुजारी आढळल्यास मंदिर बंदीची कारवाई करण्यात येणार आहे. तर भाविकांना देखील मंदीरात जाण्यापासून रोखले जाणार आहेत, अशी माहिती मंदिर संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com