
सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. परराष्ट्र मंत्रालयात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सरकारी विभागात नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सेक्शन ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती mea.gov.in या वेबसाइटवर दिली आहे. तुम्हाला याच वेबसाइटवरुन अर्ज करायचा आहे.
परराष्ट्र मंत्रालयात (Ministry Of External Affairs) एकूण ७४ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ऑफिसर होण्याची ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी ६ जूनपर्यंत अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.
परराष्ट्र मंत्रालयातील ()या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा ५६ पेक्षा जास्त नसावी. या नोकरीसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.सेक्शन ऑफिसर पदांसाठी ही भरती होणार आहे. देशातील ३७ रिजनल पासपोर्ट ऑफिसेसमध्ये ही भरती केली जाणार आहे.
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड २ वर्षांसाठी केली जाईल. त्यानंतर ती वाढवण्यातदेखील येऊ शकते. या नोकरीसाठी तुम्हाला भरघोस पगारदेखील मिळणार आहे. देशातील अनेक पासपोर्ट ऑफिसेसमध्ये या अधिकाऱ्यांची भरती केली जाणार आहे.
या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्जाचा नमुना डाउनलोड करायचा आहे. त्यानंतर हा फॉर्म भरुन तो ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे. तुम्हाला हा अर्ज सेक्शन ऑफिसर , कॅडर, पीएसपी विभाह, परराष्ट्र मंत्रालय, कक्ष २६, पटियाला हाऊस, नवी दिल्ली येथे पाठवायचा आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला सांगण्यात येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.