Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: महाराष्ट्र राज्याच्या अन्न व औषधे प्रशासन विभागात नोकरीची संधी; मिळणार १२२८०० रुपये पगार; असा करा अर्ज

Food And Drug Administration Recruitment: महाराष्ट्र शासनाच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. या विभागात विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. अन्न व औषध प्रशासनात ५६ रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासनातील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑक्टोबर २०२४ आहे. त्यामुळे ज्या तरुणांना सरकारी नोकरी करायची आहे त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. (Government Job)

महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागात वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (Senior Technical Assistant) आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ (Analytical Chemist) पदासाठी भरती करण्यात येणार आहे.

वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान विषयासह पदवीधर किंवा फार्मसीमध्ये पदवीधर असणे गरजेचे आहे. तसेच विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून केमिस्ट्री किंवा बायो केमिस्ट्री विषयातून पदवीधर असणे गरजेचे आहे.या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. fdamfg.maharashtra.gov.in या वेबसाइटवर नोकरीबाबत सर्व माहिती देण्यात आली आहे. (Food And Drug Administration Recruitment)

या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २३ सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑक्टोबर २०२४ आहे. या नोकरीसाठी १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी उमेदवारांना दर महिन्याला ३५,४०० ते १,२२,८०० रुपये वेतन मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Night Jasmine: घराच्या बागेत लावा पारिजातकाचं झाड, मनमोहक सुगंधाने बहरेल तुमची बाग

Saam Exit Poll : सावंत की पडळकर? मतदारांचा कौल कुणाला, पाहा एक्झिट पोल VIDEO

Arjuni Morgaon Exit Poll : अर्जुनी मोरगाव मतदारसंघात कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: औसामध्ये भाजपचे अभिमन्यू पवार होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra exit polls : माकप डहाणूचा गड राखणार का? कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT