ISRO Jobs: इस्त्रोमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; पदवीधर उमेदवार करु शकतात अर्ज; जाणून घ्या सविस्तर

ISRO Recruitment 2024: सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. सध्या इस्त्रोमध्ये २२० पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.
ISRO Jobs
ISRO JobsSaam tv
Published On

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायजेशन म्हणजेच इस्त्रोमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. इस्त्रोच्या ह्यूमन स्पेस फ्लाइट सेंटर (HSFC)ने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इस्त्रासारख्या मोठ्या संस्थेत काम करण्याची ही उत्तम संधी आहे. या भरती मोहिमेत २२४ पदे रिक्त जागा आहेत.

इस्त्रोच्या या भरती मोहिमेत अर्ज करण्याची सुरुवात झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑक्टोबर २०२४ आहे.या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी hsfc.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. (ISRO Recruitment 2024)

ISRO Jobs
Coast Guard Jobs: १०वी पास तरुणांना सरकारी नोकरीची संधी, तटरक्षक दलात भरती; अर्ज कुठे कराल? जाणून घ्या सविस्तर

या भरती मोहिमेत शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे. १०वी सोबत ITI, इंजिनियरिंग डिप्लोमा, बॅचलर डिग्री, बीएससी, एमई, एमटेक, एमबीबीएस पदवी प्राप्त केलेली असावी. याबाबत अधिसूचना अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

या नोकरीसाठी वयोमर्यादा पदानुसार वेगवेगळी आहे. १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी ७५० रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे. (ISRO Recruitment)

ISRO Jobs
Mazgaon Dock Job: माझगाव डॉकमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; 'या' पदासाठी सुरु आहे भरती; जाणून घ्या सविस्तर

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परिक्षेद्वारे केली जाणार आहे.नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला hsfc.gov.in या वेबसाइटवर जाऊन भरती या सेक्शनवर क्लिक करा. त्यानंतर स्वतः ला रजिस्टर करुन घ्यावे. यानंतर तुमच्यासमोर फॉर्म ओपन होईल. तो भरावा त्यानंतर शुल्क भरावे. या फॉर्मची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा. (Isro Job)

ISRO Jobs
Job Recruitment: नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये Non-Executiveपदांसाठी भरती; 'या' तारखेपूर्वी करा अर्ज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com