Mazgaon Dock Job: माझगाव डॉकमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; 'या' पदासाठी सुरु आहे भरती; जाणून घ्या सविस्तर

Mazgaon Dock Recruitment 2024: नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. माझगाव डॉकमध्ये नॉन एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती करण्यात येणार आहे.
Mazgaon Dock Job
Mazgaon Dock RecruitmentSaam Tv
Published On

Mazgaon Dock Job: अनेकांची मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर नोकरी करण्याची इच्छा असते. जर तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. माझगाव डॉकमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती जहीर करण्यात आली आहे.

माझगाव डॉक शॉपबिल्डर्स लिमिटेडमध्ये नॉन एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती करण्यात येणार आहे. १७६ रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.

Mazgaon Dock Job
Government Job: डिप्लोमा झालाय? सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; या कंपनीत सुरु आहे भरती; अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

नॉन एक्झिक्युटिव्ह पदासाठी ही भरती केली जाणार आहे. ज्युनिअर ड्राफ्ट्समॅन, पॅरामेडिक्स आणि सुरक्षा इन्स्पेक्टर पदासाठी भरती केली जाणार आहे. ज्युनिअर ड्राफ्ट्समॅन (सिविल) पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून/संस्थेतून १०वी पास आणि आयटीआय पास केलेले असावे.

पॅरामेडिक्स पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून १२वी पास केलेले असावे त्याचसोबत ३ वर्षांचा अॅडव्हान्स कार्डियाक लाइफ सपोर्टचा डिप्लोमा केलेला असावा. सुरक्षा इन्स्पेक्टर पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनियरिंग डिप्लोमा केलेला असावा. (Mazgoan Dock Job)

Mazgaon Dock Job
CIDCO Job: सिडकोमध्ये नोकरीची संधी; पगार २ लाख रुपये; पात्रता आणि अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Eligibility and Application Process: या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अधिकृत वेबसाइटवर या नोकरीबाबत सर्व माहिती देण्यात आली आहे. १८ ते ३० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑक्टोबर २०२४ आहे.(Mazgaon Dock Recruitment)

Mazgaon Dock Job
Indian Oil Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; इंडियन ऑइलमध्ये भरती सुरु; मिळणार १६०००० रुपये पगार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com