Nashik Fire Department Bharti Saam Tv
naukri-job-news

Jobs In Nashik: १०वी पास, पगार ६३,३०० रुपये, नाशिक अग्निशमन दलात नोकरीची सुवर्णसंधी; आजच करा अर्ज

Nashik Fire Department Recruitment: अग्निशमन दलात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. अग्निशमन दलात चालक आणि फायरमन पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नाशिक अग्निशमन दलात सध्या भरती सुरु आहे. अग्नीशमन दलात चालक आणि फायरमन पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. इच्छुकांनी आधी ही अधिसूचना वाचावी त्यानंतर अर्ज करावेत.

नाशिक अग्निशमन दलात १८६ पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १ डिसेंबर होती मात्र आता अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. तुम्हाला १६ डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यामुळे जर अजूनही कोणी अर्ज केला नसेल तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहेय

नाशिक अग्निशमन दलातील या नोकरीसाठी इच्छुकांनी https://www.nmc.gov.in/ या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. या नोकरीबाबत तुम्हाला पीडीएफ जाहिरातीत माहिती दिली आहे.

नाशिक अग्निशमन दलात चालक, फायरमन अशी एकूण १८६ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. चालक पदासाठी ३६ जागा रिक्त आहेत. फायरमन पदासाठी १५० जागा रिक्त आहेत. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

अग्निशमन दलातील चालक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी १०वी पास असणे गरजेचे आहेत. याचसोबत राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई येथे ६ महिन्यांचा अग्निशामक कोर्स केलेल्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. उमेदवाराकडे जड वाहन परवाना असणे गरजेचे आहे. याचसोबत उमेदवारांना मराठी वाचता लिहता यायला हवे.

फायरमन पदासाठी १०वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत ६ महिन्यांचा प्रशिक्षण कोर्स केलेले असावा. मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे.

पगार

चालक पदासाठी २१,७०० ते ६९,१०० रुपये पगार तर फायरमन पदासाठी १९,९०० ते ६३,२०० रुपये पगार मिळणार आहे.

अर्ज कसा करावा?

उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी शेवटचे १६ दिवस उरले आहेत. या नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्ही जाहिरात वाचावी. अर्ज करताना खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना १००० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महायुतीचे अखेर ठरले! कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार

मोठी बातमी! देशातील बड्या राज्याचे विभाजन होणार? भाजप नेत्याची मागणीने चर्चांना उधाण

अंतर्गत वादात काँग्रेस सत्ता गमावणार? तुम्ही खासदार आहात, मालक समजू नका

सत्तास्थापनेत नवा ट्विस्ट! भाजपला शह, शिंदेसेना–मनसे युतीमुळे सत्तेचा खेळ पलटला

एका लॉटरीमुळे भाजपची झोप उडणार? 'मुंबई'चा महापौर 'ठाकरे'च होणार?

SCROLL FOR NEXT