बँकेत नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. जर तुम्हालाही बँकेत नोकरी करायची असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. इंडियन ओव्हरसीज बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंडियन ओव्हरसी बँकेत JMG स्केल I मध्ये अधिकारी आणि क्लर्क कॅडर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. (Indian Overseas Bank Recruitment)
इंडियन ओव्हरसीज बँकेतील ही भरती १६ रिक्त पदांसाठी होणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही १३ डिसेंबरपर्यंत अर्ज करु शकतात.
जर तुम्हाला खेळाची आवड असेल आणि त्यात करिअर करायचे असेल तर ही खूप चांगली संधी आहे. बास्केटबॉलसाठी ४ पदे रिक्त आहेत. हॉकीसाठी ४ पदे, वॉलिबॉलसाठी ४ पदे, क्रिकेटसाठी ४ पदे रिक्त आहेत. एकूण १६ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. (Bank Jobs)
या नोकरीसाठी १८ ते २६ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून १२वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ७५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे.
इंडियन ओव्हरसीज बँकेत अधिकारी (JMG स्केल I)पदासाठी ४८,४८० ते ८५,९२० रुपये पगार मिळणार आहे. क्लर्क कॅडर पदासाठी २४,०५० ते ६४,४८० पगार मिळणार आहे.अनुभवानुसार उमेदवारांचा पगार वाढणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. (Indian Overseas Bank Recruitment Process)
समाज कल्याण विभागात भरती
सध्या महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागातदेखील नोकरीची सुवर्णसंधी आहे. समाज कल्याण विभागात सिनियर समाज कल्याण निरीक्षक, समाज कल्याण निरीक्षक, वॉर्डन, स्टेनोग्राफर पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना २५,५०० ते १,४२,४०० रुपये पगार मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.