
प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट हे असतेच. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दर सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला तुमच्या अकाउंटला पेन्शनची रक्कम तुमच्या अकाउंटला जमा होते. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी रिटायरमें बेनिफिट स्कीम आहे. या स्कीमला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी मॅनेज करते. ईपीएफ अकाउंटमध्ये कंपनी आणि कर्मचाऱ्यांकडून दर महिन्याला पैसे जमा केले जातात.(EPF Calculation)
ईपीएफओ योगदान हे मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या १२-१२ टक्के आहे. दरवर्षी सरकार ईपीएफचे व्याजदरदेखील ठरवते. २०२२-२०२३ साठी ईपीएफवरील व्याजदर हे ८.१ टक्के होते. त्यामुळे तुमच्या पीएफ अकाउंटमध्ये पैसे जमा केले जातात.
EPF चे कॅलक्युलेशन
जर तुमचा मूळ पगार आणि महागाई भत्ता मिळून १५००० रुपये पगार आहे आणि तुमचे वय ४० वर्ष आहे. तर निवृत्तीच्या वेळी म्हणजेच ५८ व्या वर्षा तुमच्याकडे २७.६६ लाख रुपयांचा निधी जमा होऊ शकतात. (EPF Calculation On Basic Salary)
बेसिक सॅलरी-१५००० रुपये
तुमचे वय- ४० वर्ष
सेवानिवृत्तीचे वय-५८ वर्ष
कर्मचाऱ्याचे महिन्याला कॉन्ट्रिब्युशन- १२ टक्के
एम्प्लॉयर मंथली कॉन्ट्रिब्युशन-३.६७ टक्के
ईपीएफवरील व्याजदर-८.१ टक्के
वार्षिक पगारात वाढ-१० टक्के
५८ वर्षानंतर मॅच्युरिटी फंड-२७.६६ लाख रुपये
EPF अकाउंटमध्ये कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी आणि महागाई भत्त्यातील १२ टक्के जमा केले जाईल. तसेच नियोक्त्याचे १२ टक्के २ वेगवेगळ्या हिस्स्यांमध्ये दिले जाते. पीएफ अकाउंटधील पैसे ही एक गुंतवणूक असते. त्यावर तुम्हाला व्याजदर देखील मिळते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.