प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट हे असतेच. पीएफ अकाउंटमध्ये कर्मचाऱ्याच्या पगाराची एक ठरावीक रक्कम जमा केली जाते.यात कंपनीकडूनदेखील पगार दिला जातो. पीएफ खात्यात जमा केलेले पैसे ही एक गुंतवणूक असते. पीएफ खाते हे ईपीएफओद्वारे चालवले जाते.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर तुम्हाला व्याजदरदेखील मिळते. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला ठरावीक रक्कम दिली जाते. तुम्ही जे पैसे आयुष्यभर पीएफ खात्यात जमा करतात. तेच पैसे तुम्हाल सेवानिवृत्तीनंतर दिले जातात. (Money Withdrwal From PF Account)
पीएफ खात्यातील पैसे तुम्ही आप्तकालीन परिस्थितीत काढू शकतात. जर घरात काही मेडिकल इमरजन्सी असेल किंवा कोणाचे लग्न असेल तर तुम्ही पैसे काढू शकतात. पीएफ खात्यातील पैसे काढण्यासाठी तुमच्याकडे तुमचा UAN नंबर असणे आवश्यक आहे. त्याचसोबत आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक अकाउंट लिंक असणे गरजेचे आहे.
जर तुम्हाला पीएफ खात्यातून पैसे काढायचे असतील तर तुम्ही ऑनलाइन पद्धतीने काढू शकतात. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच https://uinifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterferance/ वर जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा यूएएन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावे लागेल. (How To Withdraw Money From PF Account)
यानंतर तुम्हाला Online Services यावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर ड्रॉप डाउन मेन्यूमधून Claim (Form 31,19 & 10C)सिलेक्ट करावे लागेल. त्यानंतर स्क्रिनवर तुमची माहिती दिसेल. त्यानंतर तुमच्या बँक अकाउंट नंबरचे शेवटचे ४ नंबर टाकून वेरिफाय करा.
यानंतर तुम्हाला अंडरटेकिंग सर्टिफिकेटवर साइन करावे लागेल. त्यानंतर Procees For Online Claim वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर फंड ऑनलाइन पद्धतीने काढण्यासाठी PF Advance (Form 31) निवडा.
यानंतर तुमच्या स्क्रिनवर एक नवीन सेक्शन ओपन होईल. तिथे तुम्हाला Purpose For Which Advance Is Require वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला जेवढी रक्कम काढायची आहे ते टाकावी लागेल. त्यानंतर वेरिफिकेशन करावे लागेल. यानंतर तुम्हाला काही कागदफत्रे अपलोड करावे लागतील.
यानंतर तुमच्या कंपनीला विड्रॉ रिक्वेस्ट मान्य करावी लागेल. त्यानंतर तुमच्या पीएफ खात्यातून पैसे रजिस्टर बँक अकाउंटमध्ये पाठवले जातील. १५-२० दिवसांत तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे दिले जातील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.