EPFO News: EPFO चा मोठा निर्णय! पीएफ अकाउंटमध्ये पैसे जमा झालेत की नाही कळणार एका मेसेजवर

EPFO Money Recived Or Not: प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट असतेच. तुमच्या पीएफ अकाउंटमध्ये कंपनीने पैसे जमा केलेत की नाही, याचा तुम्हाला आता मेसेज येणार आहे.
EPFO News
EPFO NewsSaam Tv
Published On

भारतात प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट हे असतेच. प्रत्येक कर्मचाऱ्याचे दर महिन्याला पगारातील काही पैसे हे पीएफ अकाउंटला जाते. तर काही पैसे हे कंपनी आपल्या अकाउंटला जमा करते. पीएफ अकाउंट ही एक गुंतवणूक असते. अनेकदा कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ अकाउंटमध्ये फ्रॉड होतात. याच फ्रॉडला आळा घालण्यासाठी ईपीएफओने कठोर पाऊल उचलले आहे.

कर्मचाऱ्यांना आता ईपीएफ अकाउंटमद्ये पैसे जमा झाल्यानंतर एसएमएस मिळतो. त्यामुळे तुमच्या अकाउंटला पैसे जमा झालेत की नाही याची माहिती मोबाईलवर मिळते. (EPFO Balance)

EPFO News
PPF Scheme: कामाची बातमी! दररोज फक्त २०४ रुपये गुंतवा अन् करोडपती व्हा

मिळालेल्या माहितीनुसार, ईपीएफओमध्ये अनेकदा तक्रारी येतात. काही कर्मचाऱ्यांचे पैसे दर महिन्याला कापले जाते परंतु कंपनी हे पैसे ईपीएफ अकाउंटला वेळेवर जमा करत नाही. कंपनी या पैशांचा स्वतःसाठी वापर करते. त्यानंतर हे पैसे ईपीएफ अकाउंटला जमा करते. परंतु यामुळे अनेक फ्रॉड होण्याची शक्यता असते. त्यामुळे ईपीएफओने आयटी सिस्टीममध्ये बँकासारखी सुरु केली आहे. त्यामुळे फ्रॉडला आळा घातला जाणार आहे.

ईपीएफओच्या या नवीन सिस्टिममुळे ईपीएफ सदस्यांना पैसे जमा झाल्यानंतर एसएमएस येतो.ही माहिती रजिस्टर मोबाईल नंबरवर पाठवतो. त्यामुळे ईपीएफ अकाउंटला मोबाईल नंबर रजिस्टर करा. नाहीतर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतात. (EPFO News)

EPFO News
Lakhpati Didi Scheme : खुशखबर! लाडक्या बहिणींसाठी सरकार देतंय ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज

ईपीएफओच्या अधिकाऱ्यांनी आयटी सिस्टीम अपग्रेड करण्याची माहिती दिली आहे. ईपीएफओच्या बँक अपग्रेडनंतर कर्मचाऱ्यांना त्यांचे पैसे जमा झालेत की नाही याबाबतची माहिती मोबाईलवर मिळणार आहे.

EPFO News
Government Scheme: मोदी सरकारचं देशातील नागरिकांना दसरा गिफ्ट; तब्बल चार वर्ष मिळणार मोफत धान्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com