Ladki Bahin Yojana : आनंदाची बातमी! आजच बँक खातं तपासा; लाडक्या बहि‍णींच्या खात्यात पुन्हा ३००० रुपये जमा

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे तब्बल ३००० रुपये महिलांच्या खात्यात जमा होत आहेत.
Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे कमालीची; महिलांसाठी ठरली 
फलदायी
Mukhyamantri Majhi Ladki Bahin YojanaSaam Digital
Published On

मुख्यमंत्री माझी लाकडी बहीण योजनेची सर्वत्र चर्चा सुरु आहे. राज्यातील बहिणी खात्यात योजनेचे पैसे येत असल्याने आनंदी आहेत. त्यात आता बहि‍णींचा हा आनंद आणखी द्विगुणीत झाला आहे. कारण या महिन्यात पुन्हा एकदा लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ३००० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तुमच्याही खात्यात आणखी ३००० रुपये जमा झाले असतील तर आजच तुमचं बँक खातं तपासा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे कमालीची; महिलांसाठी ठरली 
फलदायी
Mukhyamantri Yojana Doot : गावागावात तरुणांची नोकरी पक्की; शिंदे सरकारकडून ५०,००० जागांसाठी भरती, कसा कराल अर्ज?

मिळालेल्या माहितीनुसार, महिलांना लाडकी बहिणी योजनेमार्फत दर महिन्याला १५०० रुपये आर्थिक मदत केली जाते. सध्या सणासुदीचा काळ सुरु आहे. गरबा आणि नवरात्रीच्या दिवसांत महिलांचे बरेच खर्च होतात. लाडक्या बहि‍णींना यासाठी सरकारने पुढील नोव्हेंबर महिन्याचे पैसे आता ऑक्टोबरमध्येच देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ज्या पात्र महिला आहेत त्यांच्या खात्यात ३००० रुपये जमा होण्यास सुरूवात झाली आहे.

महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा होण्यास सुरुवात

काल काही महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा झाले आहेत. आज देखील काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील. महिलांनी काहीही चिंता करू नका. "दिवाळीआधी भाऊबीज म्हणून आम्ही नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच खात्यात जमा करणार आहोत. ", अशी घोषणा काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पावर यांनी एका सभेत केली होती. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी असं म्हटलं होतं. त्यांनी म्हटल्याप्रमाणे आता महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या महिन्यात प्रत्येक महिलेच्या खात्यात ३००० रुपये जमा होत आहेत.

महिलांना एकूण किती पैसे मिळाले?

लाडकी बहीण योजनेमुळे सर्वच पात्र बहि‍णींना महिन्याला १५०० रुपये मिळत आहेत. राज्यात या योजनेसाठी कोट्यावधी बहिणी पात्र ठरल्या आहेत. योजना जुलै महिन्यापासून लागू झाली आहे. मात्र फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरु असल्याने महिलांना हे पैसे ऑगस्ट महिन्यात मिळाले. म्हणजे पहिला हप्ता जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा मिळून एकूण ३००० रुपये जमा झाले. १७ आणि ३१ ऑगस्टला हे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले होते.

त्यानंतर अर्जची मुदत वाढवण्यात आली, तेव्हाही अनेक महिलांनी योजनेसाठी अर्ज केला. सप्टेंबर महिन्यात महिलांना १५०० रुपये मिळाले. ज्या महिलांना सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला त्यांना थेट जुलैपासून आतापर्यंतचे ४५०० रुपये मिळाले होते. त्यानंतर आता पुन्हा ऑक्टोबरमध्ये महिलांना ३००० रुपये मिळत आहेत. म्हणजे आतापर्यंत महिलांना या योजनेमार्फत एकूण ७५०० रुपये मिळालेत.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे कमालीची; महिलांसाठी ठरली 
फलदायी
Mukhyamantri Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काय आहे? महिलांना दरमहा किती रुपये मिळणार, जाणून घ्या; VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com