Success Story: केवळ २ हजारांत सुरुवात, आता महिन्याला ६ लाखांची कमाई; ठाण्याच्या 'लाडक्या बहिणी'ची यशोगाथा
प्रत्येकाला पैसे कमवायचे असतात. यासाठी काही जण नोकरी करतात तर काही जण बिझनेस...तुम्हालाही बिझनेस करायचाय पण कल्पना सुचत नाहीये किंवा रिस्क घेण्यासाठी घाबरताय? तर ठाण्यातील या महिलेचं उदाहरण पाहा. ठाण्यात राहणाऱ्या ललिता पाटील यांनी २०१६ साळी अवघ्या २००० रूपयांमध्ये या बिझनेसला सुरुवात केली होती. आणि आता त्या दर महिन्याला ७ लाख रूपये कमावतायत. त्यांची ही यशोगाधा नेमकी काय आहे पाहूयात.
ठाण्यातील ललिता पाटील यांनी घरबसल्या टिफिन सेवा सुरू करून १ कोटी रुपयांची कमाई केली आहे. 2016 मध्ये ललिता यांनी केवळ 2,000 रुपयांमध्ये टिफिन सेवा सुरू केली होती. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी ब्रिटानिया इंडस्ट्रीजची स्टार्टअप स्पर्धा जिंकून 7 लाख रुपये जिंकले. या पैशातून त्यांनी स्वत:चं 'घरची आठवण' हे रेस्टॉरंट सुरू केलं. आता त्यांचा बिझनेस महिन्याला ६-७ लाख रुपये त्यांना मिळवून देतो.
२०१६ ला सुरु केला होता छोटा बिझनेस
ललिता यांचं वयाच्या २० व्या वर्षी लग्न झालं. त्या फिजिक्स ग्रॅज्युएट असून आर्थिक बाबतीत स्वतंत्र असावं अशी त्यांनी नेहमीपासूनची इच्छा होती. यावेळी सुरुवातीला त्यांनी मुलांचे ट्यूशन घेतले. त्यानंतर फार्मसी कंपनीची औषधं देखील विकली. मात्र, त्यांना त्यांच्या कामातून समाधान मिळत नव्हतं. ललिताच्या पतीची गॅस एजन्सी होती. मात्र राज्य सरकारने नवीन गॅस पाइपलाइन सुरू केल्यानंतर त्यांचा व्यवसाय ठप्प झाला. अशावेळी 2016 मध्ये ललिताने टिफिन बॉक्ससाठी 2,000 रुपये आणि पॅम्पलेट वाटण्यासाठी 500 रुपये गुंतवून तिचा होम टिफिनचा बिझनेस सुरू केला.
ललिताने अनेक आव्हानांचा केला सामना
प्रत्येकाला घरचं जेवण जेवायचं असतं. बाहेर गावाहून आलेल्या व्यक्तींना त्यांच्या घरातील जेवणाची चव सतत आठवते. अशावेळी ललिताने तिच्या टिफिन सर्विसचं नाव घरची आठवण ठेवलं. जेणेकरून तिच्याकडे येऊन पोटभर जेवणाऱ्या व्यक्तींना घरासारखं जेवण मिळू शकेल. यावेळी बिझनेस सुरु झाल्यानंतर सर्वकाही ठीक सुरु होतं. मात्र त्यांना कळलं की, बिझनेस वाढत असूनही लोक तिला 'गृहिणी' म्हणून पाहतात. ललिताला बिझनेस वुमन म्हणून आपला ठसा उमटवायचा होता. आपला व्यवसाय वाढवण्याची खूप इच्छा होती. पण तिला कोणीही कर्ज द्यायला तयार नव्हतं.
2019 मध्ये ललिताने एका न्यूजपेपरमध्ये ब्रिटानिया इंडस्ट्रीजच्या स्टार्टअप स्पर्धेबद्दल पाहिलं. या स्पर्धेतील विजेत्याला 10 लाख रुपयांचं बक्षीस मिळणार होतं. ललिताने यामध्ये तिची गोष्ट शेअर केली आणि स्पर्धा जिंकली. यानंतर टॅक्सचे आणि इतर पैसे कापल्यानंतर तिला ७ लाख रुपये मिळाले. या पैशांचा तिने व्यवसायात वापर केला आणि रेस्टॉरंटमध्ये 6 लाख रुपये गुंतवले.
वर्षाला कमावतात १ कोटी रूपये
या पैशातून ललिताने जुलै 2019 मध्ये ठाण्यातील कोपरी या भागात स्वतःचं रेस्टॉरंट 'घरची आठवण' उघडलं. आज ललिताचा बिझनेस घरपोच जेवण आणि टिफिन सेवेद्वारे दरमहा ६-७ लाख रुपये तिला मिळवून देतो. तर त्यांच्या व्यवसायाची वार्षिक कमाई एक कोटी रुपये आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.