Government Schemes : वयाच्या ६० नंतर तुम्हाला दरमहा मिळेल ५००० रुपये पेन्शन, अटल पेन्शन योजनेसाठी कसा करायचा अर्ज; वाचा...

Atal Pension Yojana : निवृत्तीनंतर आपलं आयुष्य सुरक्षित करण्यासाठी तुम्हीही जर एखाद्या चांगल्या योजनेत पैसे गुंतवायचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
Government Schemes : वयाच्या ६० नंतर तुम्हाला दरमहा मिळेल ५००० रुपये पेन्शन, अटल पेन्शन योजनेसाठी कसा करायचा अर्ज; वाचा...
Atal Pension YojanaSaam Tv
Published On

जर तुम्ही निवृत्तीनंतर तुमच्या आयुष्यासाठी चांगले आर्थिक नियोजन केले नाही, तर वयाच्या ६० नंतर तुम्हाला अनेक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. याचमुळे बरेच लोक काम करताना आपल्या उत्पन्नातील काही रक्कम बचत करतात आणि बँकेत जमा करतात.

मात्र आज महागाईत झपाट्याने वाढ होत असताना तुम्ही तुमची बचत चांगल्या ठिकाणी गुंतवावी. जर तुम्हाला तुमच्या भविष्याची काळजी वाटत असेल तर तुम्ही तुमची बचत अटल पेन्शन योजनेत गुंतवू शकता. अटल पेन्शन योजना ही भारत सरकारद्वारे चालवली जाणारी एक योजना आहे. निवृत्तीनंतर व्यक्तीचे जीवन आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करणे हा या योजनेचा उद्देश आहे. 

Government Schemes : वयाच्या ६० नंतर तुम्हाला दरमहा मिळेल ५००० रुपये पेन्शन, अटल पेन्शन योजनेसाठी कसा करायचा अर्ज; वाचा...
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ; अर्ज कुठे आणि कसा करायचा? स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

१८ ते ४० वर्षे वयोगटातील लोक अर्ज करू शकतात आणि अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक सुरू करू शकतात. गुंतवणुकीची रक्कम तुम्ही अर्ज करत असलेल्या वयाच्या आधारे ठरवली जाते.

जर तुम्ही वयाच्या १८ व्या वर्षी या योजनेसाठी अर्ज केला तर तुम्हाला या योजनेत दरमहा २१० रुपये गुंतवावे लागतील. तुम्ही ६० वर्षांचे होईपर्यंत तुम्हाला ही गुंतवणूक करावी लागेल. वयाच्या ६० नंतर, तुम्हाला अटल पेन्शन योजनेअंतर्गत दरमहा ५००० रुपये पेन्शन मिळते. 

Government Schemes : वयाच्या ६० नंतर तुम्हाला दरमहा मिळेल ५००० रुपये पेन्शन, अटल पेन्शन योजनेसाठी कसा करायचा अर्ज; वाचा...
LIC Policy: LIC ची जबरदस्त योजना! दररोज २०० रुपये गुंतवा अन् २८ लाख कमवा

अटल पेन्शन योजनेत असे खाते उघडा

अटल पेन्शन योजनेत खाते उघडण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही. योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेत जावे लागेल. तेथे तुम्हाला अटल पेन्शन योजनेसाठी उपलब्ध फॉर्म भरावा लागेल.

या दरम्यान, तुम्हाला फॉर्मसोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील. हे सर्व केल्यानंतर तुम्हाला ते बँकेत जमा करावे लागेल. फॉर्म आणि कागदपत्रे तपासल्यानंतर बँक अधिकारी तुमचे खाते अटल पेन्शन योजनेत उघडतील. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com