महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना ही सुपरहीट ठरली आहे. या योजनेत महिलांना १५०० रुपये मिळतात. या योजनेत अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ सप्टेंबर होती. त्यानंतर आता अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता १५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. या योजनेचा लाभ न घेतलेल्या महिला आता अर्ज करु शकणार आहेत.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत अनेक महिलांचे अर्ज स्विकारले गेले नाही. दरम्यान, अनेक महिलांना अर्ज करताना काही समस्या आल्या आहेत. त्यामुळे त्यांचे अर्ज मान्य झाले नाहीत. त्यामुळेच आता या महिलांना अर्ज करण्यासाठी संधी मिळाली आहे. (Ladki Bahin Yojana)
लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन फॉर्म भरु शकतात.https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या साइटवर जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात. लाडकी बहीण योजनेची वेबसाइट ओपन झाल्यानंतर Applicant Login सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचे अकाउंट क्रिएट करा. यानंतर तुम्हाला तुमचे नाव, पत्ता, गाव याबाबत सर्व माहिती भरावी लागणार आहे. त्यानंतर कॅप्चा कोड टाकून साइन अप करा. यानंतर तुमचं अकाउंट तयार होईल. यानंतर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून इन करा. तिथे तुम्ही Application Of Mukhyamantri-Majhi Ladki Bahin Yojana वर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही तुमची आवश्यक माहिती भरा. यानंतर तुम्ही तुमचे आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड अपलोड करा. त्यानंतर सबमिट करा. तुमचा फॉर्म सबमिट झाल्याचा मेसेज तुम्हाला येईल. (Ladki Bahin Yojana Application Date Extended)
परंतु सध्या लाडकी बहीण योजनेचा फॉर्म हा फक्त अंगणवाडी केंद्रात भरला जात आहे. त्यामुळे तुम्ही या फॉर्मची प्रिंट आउट अंगणवाडीत जाऊन सबमिट करु शकता. याबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
सर्वप्रथम तुम्ही या पोर्टलवर जाऊन मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉग इन करा.
त्यानंतर Applications made Earlier वर जाऊन स्टेट्स चेक करा.
लाडकी बहीण योजनेचा अर्ज तुम्ही अंगणवाडीत जाऊन भरु शकतात. अंगणवाडी सेविकांकडून तुम्ही हा अर्ज भरुन घेऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड,रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड हे कागदपत्र अपलोड करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.