महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत असते. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना १५०० रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक वर्षी १८००० रुपये दिले जाणार आहे. आतापर्यंत या योजनेचे तीन हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. त्यानंतर आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे अॅडव्हान्समध्ये दिले जात आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता १५०० नाही तर ३००० रुपये दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना सध्या १५०० रुपये मिळत आहे ही रक्कम वाढवून टप्प्याटप्प्याने तीन हजार रुपयांपर्यंत करण्यात येईल, असं सांगितलं. रायगडमधील मोर्बे येथे लाडकी बहीण राज्यस्तरीय वचनपूर्ती सोहळ्याचे आयोजन केले होते. त्याच कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे सांगितलं आहे.महिलांच्या जीवनात सुखाचे, आनंदाचे दिवस यावे, अशीच माझी इच्छा आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला माहेरचा आहेर मिळणार आहे, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.
लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात सुपरहिट ठरली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत ७५०० रुपये मिळाले आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे ३००० रुपये एकत्रितपणे महिलांच्या अकाउंटला जमा झाले आहेत. सप्टेंबर महिन्याचे १००० रुपयेदेखील २९ सप्टेंबरला महिलांच्या अकाउंटला जमा झाले होते. (Ladki Bahin Yojana)
दरम्यान, आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे ३००० रुपये एकत्रितपणे महिलांच्या अकाउंटला जमा झाले आहेत. १० ऑक्टोबरपूर्वी महिलांच्या अकाउंटला जमा झाले आहेत. त्यामुळे दिवाळूपूर्वीच महिलांना भाऊबीजेची ओवाळणी मिळाली आहे असं म्हणायला हरकत नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.