शिक्षण आणि मेहनतीच्या जोरावर प्रत्येक व्यक्ती आयुष्यात खूप यशस्वी होतात.यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड आणि प्रतिष्ठित परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा देऊन सरकारी अधिकारी होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतु यूपीएससी परीक्षा देताना अनेकदा अपयश येते. परंतु असेही काही विद्यार्थी असतात ज्यात खूप कमी वयात यश मिळते. असंच यश विदुषी सिंग यांना मिळालं आहे. (Success Story)
विदुषी सिंग यांनी वयाच्या २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी (UPSC) परीक्षा उत्तीर्ण केली. विदुषी यांची जन्म जोधपूर येथे झाला. त्यांचे कुटुंब मूळचे अयोध्येचे होते. यूपीअससी परीक्षेची तयारी विदुषीने कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय केली. त्यांनी स्वतः अभ्यास केला. कॉलेजमध्ये असतानाच एनसीइआरटी आणि इतर पुस्तके वाचून त्यांनी अभ्यासाचा पाया मजबूत केला होता. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा दिली.
विदुषी सिंग यांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. एवढेच नाही तर त्यांनी १३ वी रँकदेखील मिळवली होती. अर्थशास्त्र हा विषय त्यांनी ऐच्छिक म्हणून निवडला होता.
१३ वी रँक मिळवूनदेखील त्यांनी आयएएसऐवजी आयएफएस ऑफिसर (IFS Officer) व्हायचे ठरवले. भारतीय परराष्ट्र सेवेत काम करण्याचे स्वप्न त्यांच्या आजोबांनी पाहिले होते. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आयएफएस ऑफिसर होण्याचे ठरवले. (IFS Officer Vidushi Singh Success Story)
विदुषी सिंह यांनी आपल्या यशामागचं रहस्य सांगितलं आहे. यूपीएससी परिक्षेत यश मिळवण्यासाठी त्यांनी टेस्ट सिरिज आणि मॉक टेस्ट दिल्या.सेल्फ स्टडी हे खूप महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. (UPSC Success Story)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.