IIM Recruitment Saam Tv
naukri-job-news

IIM Recruitment: IIM मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी सुरु आहे भरती; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

IIM Mumbai Recruitment: IIM ही देशातील सर्वाधिक लोकप्रिय शिक्षणसंस्था आहे. आयआयएममध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. विविध पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

८वी आणि दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबईमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे. ४ रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. या नोकरीसाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.

IIM मध्ये नोकरी करण्यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहेत. २९ ऑगस्ट २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या नोकरीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ड्रायव्हर आणि पॅन्ट्री अटेंडेंट पदासाठी ही भरती केली जाणार आहे. ड्रायव्हर पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वी पास असणे गरजेचे आहे. त्याचसोबत त्याच्याकडे ड्रायविंग लायसन्स असावे. या पदासाठी उमेदवाराला १५,००० ते २०,००० रुपये मासिक वेतन मिळणार आहे. पॅन्ट्री अटेंडेंट पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून दहावी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत कामाचा अनुभव असावा. या नोकरीसाठी उमेदवाराला १५,००० रुपये वेतन मिळणार आहे.

ड्रायव्हर पदासाठी १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. पॅन्ट्री अटेंडंट पदासाठी १८ ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑगस्ट २०२४ आहे.

या नोकरीसाठी अर्ज तु्म्हाला ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे. प्रशासन विभाग, आयआयएम मुंबई, विहार तलाव, पवई, मुंबई ४०००८७ येथे अर्ज पाठवायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT