Dahi Handi Vima Yojana: हंडी फोडताना जखमी झालेल्या गोविंदांना मिळणार लाखोंची मदत; अर्ज कसा कराल?

Dahi Handi Vima Yojana For Govinda: गोविंदापथकांसाठी सरकारची खास योजना आहे. दहीहंडी सोहळ्यात जर कोणताही गोविंदा जखमी झाला तर त्यांना आर्थिक मदत मिळणार आहे.
 Dahi Handi Vima Yojana
Dahi Handi Vima YojanaSaam Tv
Published On

महाराष्ट्रात दरवर्षी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दहिहंडीनिमित्त गोविंदा अनेक थर लावतात.आतापर्यंत गोविंदा पथकांनी ९ थर लावून विक्रम केला आहे. या दहीहंडीच्या कार्यक्रमात कोणाला इजा होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेतली जाते. दहीहंडी उत्सवात अनेक दुर्घटना होतात. अनेक गोविंदा जखमी होतात. काही गोविंदांचा दुर्दैवी मृत्यूदेखील होतो. त्यामुळे या गोविंदाच्या कुटुंबियांना आर्थिक संरक्षण मिळावे, यासाठी आर्थिक सहाय्य योजना राबवली आहे.

 Dahi Handi Vima Yojana
Unified Pension Scheme: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; नव्या पेन्शन योजनेला केंद्राची मंजुरी

दहीहंडी उत्सवात गोविंदाना थर लावताना इजा होऊ शकते , त्यांचा अपघाती मृत्यूदेखील होऊ शकतो. त्यामुळे या अपघातग्रस्त गोविंदाच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी सरकारने योजना राबवली आहे.

दहीहंडी विमा योजनेत जर कोणत्या गोविंदाचा अपघाती मृत्यू झाला तर त्या व्यक्तीला १० लाख रुपयांचा विमा मिळतो. यामुळे त्याच्या कुटुंबाना आर्थिक मदत मिळते. जर एखाद्या गोविंदाने हात, पाय किंवा डोळा गमावल्यास त्याला ५ लाख रुपयांचा विमा मिळतो. तसेच दोन अवयव किंवा दोन डोळे गमावल्यास १० लाख रुपये मिळतात. एखाद्या गोविंदाला दहीहंडी उत्सावात पूर्णपणे अपंगत्व आले तर १० लाख रुपये मिळतात. अपघातात जखमी झाल्यामुळे रुग्णालयातील खर्चासाठी १ लाख रुपयांची मदत केली जाते.

दहीहंडी उत्सावात थर लावणाऱ्या गोविंदाना विमा उतरवून आर्थिक संरक्षण दिले जाते, याच उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली आहे.

 Dahi Handi Vima Yojana
Government Scheme For Farmers : खुशखबर! शेतकऱ्यांना अत्यंत कमी व्याजदरात मिळणार तब्बल 2 कोटी रुपयांपर्यंचे कर्ज; काय आहे केंद्र सरकारची नवी योजना? जाणून घ्या...

अटी आणि नियम

अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवासी असणे गरजेचे आहे. दहीहंडी उत्सवात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या गोविंदानाच ही मदत मिळणार आहे. दहीहंडी उत्सवात सहभागी असलेल्या व्यक्तींनी मनोरे रचण्यासाठी प्रशिक्षण घेतले आहे की नाही याची खात्री आयोजकांनी करुन घेतली पाहिजे.

 Dahi Handi Vima Yojana
Atal Pension Scheme: रोज ७ रुपये गुंतवा अन् आयुष्यभर ६०,००० रुपयांची पेन्शन मिळवा;काय आहे अटल पेन्शन योजना?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com