ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदू धर्मात शुक्रावारचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.
शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा केली जातो. या दिवशी लक्ष्मीदेवीचे व्रत केल्यास तुमच्या घरात धनदान्याची भरभराट होते.
शुक्रवारी संध्याकाळी देवीची पूजा करताना काही विशेष गोष्टी केल्यास घरातील आर्थिक परिस्थिती सुधारते.
शुक्रवारी पुर्ण दिवस लक्ष्मीदेवीचे व्रत करून रात्री तिची पूजा करावी.
संध्याकाळी देवपूजा करताना घराच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी.
पूजा करताना देवासमोर तुपाचा दिवा लावावा यामुळे घरामध्ये सकारात्मक उर्जा येते.
लक्षमीदेवीची पूजा करताना कमळाचे फूल आणि करवंदाचे फळ अर्पण करावे यामुळे लक्षमीदेवीची कृपा सदैवं सोबत राहाते.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.