सुशांत सावंत -
मुंबई: मुंबईकरांच्या (Mumbai) आवडीचा तसंच अभिमानाचा विषय असणारा दहीहंडीचा उत्सव दोन वर्षांच्या कोरोना संकटनानंतर यावर्षी जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवासाठी सर्व गोविंदा पथक तयार देखील झाली आहेत.
मात्र, दहीहंडीचे (Dahihandi) मानवी मनोरे रचताना अपघात होवू नये अशी अपेक्षा असताना देखील काहीवेळा अपघाताने थरावरचे गोविंदा खाली पडून जखमी होतात. काहींना कायमस्वरूपी अपंगत्व येते. तर काही मृत्यूमुखीही पडतात.
या पार्श्वभूमीवर मुंबई भारतीय जनता पार्टीच्या (BJP) वतीने मुंबईतील गोविंदांना सुरक्षा देण्यासाठी १० लाखाचे विमा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष, कॅबिनेट मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी दिली. अधिकाधिक गोविंदांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई भाजपाकडून करण्यात आले आहे.
मुंबईत दहीहंडी जल्लोषात साजरी केली जाते. यामध्ये गोविदांच्या सुरक्षेचा मुद्दा दरवर्षी उपस्थित केला जातो. दहीहंडी उत्सवाच्या दिवशी अनेक गोविंदा जखमी होतात. काही वेळा मृत्यूही होतो. अशा गोविंदांच्या नातेवाईकांना मदत मिळावी यासाठी भाजपाने ‘विमा सुरक्षा कवच’ राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
योजनेनुसार जर दहीहंडीवेळी गोविंदाचा अपघाती मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना १० लाख रुपये आणि कायम स्वरुपी अंपगत्व आल्यास १० लाख रुपये तसंच अपघातामुळे रुग्णालयातील खर्च १ लाख रुपयांचे विमा सुरक्षा कवच मिळणार आहे. या विम्याची मुदत १९ ऑगस्ट या दिवसभरासाठी असेल.
‘सुरक्षा कवच’ योजनेचा लाभ घेण्यासाठी गोविंदा पथकांनी मंडळाच्या लेटरहेडवर गोविंदांची वयासह नावे नोंदवून दादर वसंत स्मृती येथील भाजपा कार्यालयात जमा करावीत असे आवाहन मुंबई भाजपाच्या (Mumbai BJP) वतीने करण्यात आले आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.