MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी;१०वी-१२वी पास उमेदवार करु शकतात अर्ज;जाणून घ्या सविस्तर

MSRTC Recruitment 2024: महाराष्ट्र शासन परिवहन महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी आहे. या नोकरीसाठी १०वी आणि १२वी पास उमेदवार अर्ज करु शकतात.
MSRTC Recruitment
MSRTC RecruitmentSaam Tv
Published On

महाराष्ट्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि नाविन्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत ही भरती राबवण्यात आली आहे.

MSRTC Recruitment
Pune Police Recruitment: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई पदाची परीक्षा पुढे ढकलली, आता कधी होणार?

१०वी, १२वी आणि ITI पदवी प्राप्त उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. लिपिक, सहाय्यक, शिपाई या पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी आहे. ही भरती कंत्राटी पदासाठी केली जाणार आहे. ६८ पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ६ हजार ते १०,००० रुपये मासिक वेतन मिळणार आहे. शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्हाला वेतन मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यवतमाळ विभाग, विभागीय कार्यालयात तुम्हाला नोकरीसाठी यावे लागणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

MSRTC Recruitment
ONGC Recruitment : परीक्षा न देताही मिळवा 120000 रुपये पगाराची नोकरी; ONGC मध्ये भरतीप्रक्रिया सुरू

सध्या अनेक ठिकाणी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. सरकारी बँकेत नोकरीसाठी रिक्त पदे भरली जात आहेत. IBPS द्वारे ही भरती केली जाणार आहे. या भरतीमध्ये देशातील ११ बँकेमध्ये नोकरीची संधी आहे.

MSRTC Recruitment
Government Job : कुटुंबाची जबाबदारी टाळली तर सरकारी नोकरी जाणार, अनुकंपा नियुक्त्यांवर HC कठोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com