Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण'चे पैसे आधारकार्ड- बँक खाते लिंक नसल्याने जमा झाले नाहीत? घरबसल्या असं करा लिंक

How To Link Aadhar Card And Bank Account: लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांच्या अकाउंटला पैसे जमा झाले नाहीत. याचे कारण म्हणजे बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक नसणे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On

महाराष्ट्रात महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाखो महिलांच्या अकाउंटमध्ये पहिला हप्ता जमा करण्यात आला आहे. दोन महिन्यांचे ३००० रुपये जमा केले आहेत. परंतु अनेक महिलांच्या अकाउंटला अजून पैसे जमा झाले नाही. अनेक महिलांचे आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक नसल्यामुळेच महिलांच्या अकाउंटला पैसे जमा झाले नाहीत. परंतु आता आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक करण्यासाठी महिलांची बँकेत खूप गर्दी होत आहे. मात्र, तुम्ही आता घरबसल्या बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक करु शकतात.

घरबसल्या बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक करण्यासाठी सोपी प्रोसेस आहे. यामुळे महिलांचे काम सोपे होणार आहे. यामुळे महिलांच्या अकाउंटला लवकरात लवकर पैसे जमा होतील. (Aadhar Bank Account Linking Process)

बँक अकाउंट आणि आधार कार्ड कसं लिंक करायचं

  • आधार कार्ड बँक अकाउंटशी लिंक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.

  • यानंतर तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकावा लागेल.

  • यानंतर अकाउंट विभागात जाऊन आधार विद बँक अकाउंट (CIF) सब सेक्शनवर क्लिक करा. यानंतर आधार रजिस्ट्रेशन करण्यासाठी पासवर्ड टाकावा लागेल.

  • यानंतर एक पेज ओपन होईल. त्यात तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकावा लागेल.

  • यानंतर सबमिट करावे लागेल. सबमिट केल्यानंतर आधार कार्ड लिंक झाल्यावर तुम्हाला मेसेज मिळेल.

अॅपद्वारे बँक अकाउंट आणि आधार कार्ड कसे लिंक करावे?

  • सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या बँकेच्या अॅपवर जाऊन लॉग इन करावे लागेल.

  • यानंतर सर्व्हिस टॅबवर जाऊन माय अकाउंट्स या विभागात क्लिक करावे लागेल. यानंतर आधार कार्डचे डिटेल्स चेक करा. यानंतर तुम्हाला अपडेट करण्याचा ऑप्शन दिसेल.

  • त्यानंतर तुम्ही दोन वेळा आधार कार्ड नंबर टाका आणि सबमिट करा.

  • बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक झाल्यावर तुम्हाला मेसेज मिळेल. तुमचे बँक अकाउंट आधार कार्डला लिंक झाल्यावर तुम्हाला ब्रँच किंवा एटीएम मशीनमध्ये जाऊन चेक करा.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, सप्टेंबरमध्ये अर्ज भरला तरी 3 महिन्यांचे पैसे मिळणार

बँकेत जाऊन आधार कार्ड लिंक कसे करावे?

  • सर्वप्रथम तुम्हाला बँकेत जाऊन आधार लिकिंग अॅप्लिकेशन फॉर्म भरावा लागेल.

  • तुम्हाला आधार कार्ड लिंकिंग फॉर्म अधिकृत वेबसाइटवर मिळणार आहे. तुम्ही बँकेत जाऊनदेखील फॉर्म भरु शकतात.

  • यानंतर तुम्हाला तुमची माहिती आणि आधार नंबर भरावा लागेल. याचसोबत फोटो अॅटॅच करावा लागेल.

  • हा फॉर्म आणि आधार कार्डची कॉपी जमा करावी लागेल. तुमच्या फॉर्मचे वेरिफिकेशन झाल्यावर तुम्हाला मेसेज येईल.

  • तुमचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक झाल्यावर तुम्हाला रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर मेसेज येईल.

Ladki Bahin Yojana
Post Office Scheme: महिलांसाठी खास योजना! एकदा गुंतवणूक करा अन् २ वर्षात लखपती व्हा; जाणून घ्या सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com