Government Jobs : तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी! रेल्वेपासून ते सरकारी बँकेमध्ये सुरु आहे भरती; वाचा सर्व माहिती एका क्लिकवर

Recruitment 2024 : खूप वेळापासून तुम्ही सरकारी सरकारी नोकरी शोधत असाल, तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी वेगवेगळ्या विभागांमध्ये उपलब्ध आहेत. भरती संबंधित सविस्तर माहिती जाणून घ्या.
Recruitment 2024
Government JobsSAAM TV
Published On

भारतीय रेल्वेपासून बँका आणि दिल्ली युनिव्हर्सिटीपर्यंत अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पदांसाठी भरती जारी करण्यात आली आहे. अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपासून पात्रता आणि फॉर्म भरण्याची पद्धत याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या. तसेच याची अचूक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या विभागानुसार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

रेल्वे पॅरामेडिकल भरती 2024

भारतीय रेल्वेने पॅरामेडिकलच्या १३७६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. १७ ऑगस्टपासून नोंदणी सुरू झाली असून १६ सप्टेंबर २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या पदांसाठी फक्त ऑनलाइन अर्ज करता करता येईल. यासाठी निवड परीक्षा घेतली जाईल. याची फी 500 रुपये आहे.

भारतीय रेल्वे अधिकृत वेबसाइट : indianrailways.gov.in.

डीयू सहाय्यक प्राध्यापक भरती 2024

दिल्ली विद्यापीठातील अनेक महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी भरती सुरू आहे. राम लाल आनंद कॉलेज, हिंदू कॉलेज आणि पीजीडीएव्ही कॉलेज यांचा यात समावेश आहे. या सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पदव्युत्तर पदवी, नेट पदवी किंवा पीएचडी ही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ आणि २६ ऑगस्ट आहे. या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांचा पगार ५७ हजार ते १,८२,००० रुपये इतका आहे.

आरआरसी एनआर भरती 2024

रेल्वे रिक्रूटमेंट सेल, नॉर्दर्न रिजनने ४०९६ शिकाऊ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज चालू झाले असून १६ सप्टेंबर २०२४ ही शेवटची तारीख आहे. १५ ते २४ वयोगटातील मुलं या पदांसाठी अर्ज करू शकतात. फक्त १०० रुपये भरून तुम्ही अर्ज करू शकता. या पदासाठी ITI डिप्लोमा आणि 10वी पास विद्यार्थी अर्ज करू शकतात.

अधिकृत वेबसाइट : www.rrcnr.org

Recruitment 2024
Government Job: चंद्रपूर महानगरपालिकेत मोठी भरती; मिळणार ७५ हजार रुपये पगार; पात्रता आणि अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

इंडियन बँक भर्ती 2024

इंडियन बँकेने स्थानिक बँक अधिकारी पदाच्या ३०० जागांसाठी अर्ज मागवले आहेत. शेवटची तारीख २ सप्टेंबर २०२४ आहे. २० ते ३० वयोगटातील मुलं या पदांसाठी अर्ज करू शकतात. निवड परीक्षेद्वारे उमेदवार निवडले जातील. या पदासाठी ४८,००० ते ८५,००० रुपये प्रति महिना पगार राहील.

अधिकृत वेबसाइट : www.indianbank.in

आईबीपीएस भरती 2024

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शने स्पेशलिस्ट ऑफिसरच्या ८९६ जागांसाठी अर्ज मागवले आहेत. नोंदणी सुरू असून शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२४ आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला ८५० रुपये शुल्क भरावे लागेल. या पदासाठी ५५ ते ६० हजारांपर्यंत पगार दिला जाणार आहे. याची निवड परीक्षा तीन टप्प्यांमध्ये होईल. या पदासाठी पूर्व परीक्षा ९ नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात येईल.

Recruitment 2024
Supreme Court Recruitment: सर्वोच्च न्यायालयात १०वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी;मिळणार ६०,००० रुपये पगार; असा करा अर्ज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com