IGI Aviation Recruitment Saam Tv
naukri-job-news

IGI Aviation Recruitment: एव्हिशन सर्व्हिसमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता काय? अर्जप्रक्रिया जाणून घ्या

IGI Aviation Services Recruitment: आयजीआय एव्हिएशनमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. यामध्ये ग्राउंड स्टाफ आणि लोडर पदासाठी भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आयजीआय एविएशन सर्व्हिसेसमध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ आणि लोडर पदांसाठी भरती सुरु करण्यात आली आहे. जर तुम्हालाही ही नोकरी करायची असेल तर लवकरात लवकर अर्ज करा.

एव्हिएशनमधील नोकरीसाठी igiaviationdelhi.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. दरम्यान, आयजीआय एविएशन सर्विसेजमध्ये १४४६ रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ पदांसाठी १०१७ जागा रिक्त आहेत आणि लोडर पदासाठी ४२९ जागा रिक्त आहेत. या पदासाठी फक्त पुरुष उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.

पात्रता

एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बारावी पास असणे गरजेचे आहे.

एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ पदासाठी १८ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. लोडर पदासाठी अर्ज करणारे उमेदवार हे २० ते ४० वयोगटातील असावे.

एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ पदासाठी उमेदवारांना २५००० ते ३५००० रुपये पगार मिळणार आहे. लोडर पदासाठी १५००० ते २५००० रुपये पगार मिळणार आहे.

अर्ज कसा करावा?

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे होणार आहे. लेखी परीक्षा दहावीच्या अभ्यासक्रमानुसार असणार आहे. लेखी परीक्षा सामान्य ज्ञान, अॅप्टीट्यू, रिजनिंग, इंग्रजी आणि एव्हिएशन विषयावर होणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करताना ग्राउंड स्टाफ पदासाठी ३५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर लोडर पदासाठी अर्ज करताना २५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचं राजकारण पूर्णपणे संपणार; राऊत यांच्या भविष्यवाणीवर रामदास कदमांचा पलटवार | VIDEO

शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलं की चेहऱ्यावर दिसतात 'ही' लक्षणं

पैशांनी गच्च भरलेली बॅग, हातात सिगारेट, मंत्री संजय शिरसाटांचा व्हिडिओ व्हायरल; राज्याच्या राजकारणात खळबळ | VIDEO

Maharashtra Live News Update : परभणीच्या लिमला गावात महिलांचा दारूबंदीसाठी एल्गार, विशेष ग्रामसभेत ठराव मंजूर

Red Velvet Cupcake: बर्थडे किंवा पार्टीसाठी घरच्या घरी झटपट बनवा टेस्टी रेड व्हेल्वेट कपकेक

SCROLL FOR NEXT