Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी; महिना १,६१,००० रुपये पगार; पात्रता काय? जाणून घ्या

HCL Recruitment 2024: तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. मॅनेजर पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे.

Siddhi Hande

Government Job News: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर किंवा मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १४ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.

हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर २०२४ असणार आहे.डेप्युटी मॅनेजर (कंपनी सेक्रेटरी), सर्वे, आर अँड डीडी, एमएँडसी, एचआर, फायनान्स, लॉ अशा अनेक विभागांमध्ये ही भरती केली जाणार आहे. (Government Job)

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सीएस/ मायनिंग, सिविल इंजिनियरिंग, केमिकल इंजिनियरिंग, टेक्नोलॉजी, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स या क्षेत्रात पदवी/मास्टर्स / डिप्लोमा / एलएलबी डिग्री प्राप्त केलेली असावी. याबाबत अधिसूचना अधिकृत वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २८ ते ५५ वर्ष असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ५३,९४० ते १,६१,८२० रुपये मासिक वेतन मिळणार आहे. (Hindustan Copper Limited Job)

डेप्युटी मॅनेजर आणि डेप्युटी जनरल मॅनेजर पदासाठी निवड मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे तर इतर पदांसाठी उमेदवारांना सीबीटी परीक्षा द्यावी लागणार आहे.या नोकरीसाठी सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ५०० रुपये अर्ज शुल्क द्यावे लागणार आहे. या नोकरीबाबत सर्व माहिती हिंदुस्तान कॉपर लिमिटेड या वेबसाइटवर देण्यात आली आहे. (HCL Recruitment)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप; ठाकरेंच्या आमदाराच्या निवडणूक प्रचारात CM फडणवीसांचा फोटो|VIDEO

'माझे लग्न लावून द्या' अविवाहित तरूणाचं भाजप आमदाराला पत्र; ४३ व्या वर्षीही पठ्ठ्या सिंगल

Maharashtra Live News Update : जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे फर्निचर दुकानासह लॉजला लागली आग

Budget Tour: काय सांगता? इथे 1 रुपयाची किंमत तब्बल 300 रुपये... खिशात फक्त 1000 रुपये ठेवा अन् परदेश फिरा

मातोश्रीवर ड्रोन उडवल्याने खळबळ; अविनाश जाधवांचा सरकारवर हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT