BPSC Bharti 2024 Google
naukri-job-news

BPSC Bharti 2024: तरुणांसाठी खुशखबर! परीक्षा न देताच मिळणार सरकारी नोकरी; आजच करा अर्ज

BPSC Bharti 2024 Application Process: सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. BPSC अंतर्गत असिस्टंट प्रोफेसर पदासाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. बिहार लोकसेवा आयोग(BPSC) ने सहाय्यक प्राध्यकापांसाठी भरती सुरु केली आहे. एकूण १३३९ जागांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी अर्ज प्रक्रियादेखील सुरु झाली आहे.

BPSC सहाय्यक भरती २०२४ साठी अर्ज प्रक्रिया २६ जूनपासून सुरु झाली आहे. यापुढे एक महिना ही अर्ज प्रक्रिया सुरु राहिल. इच्छुक उमेदवारांनी BPSC च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा. यासाठी तुम्हाला bpsc.bih.nic.in या साइटवर क्लिक करा. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये ही भरती करण्यात येणार आहे.

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून MD/MS/DNB चे शिक्षण पूर्ण झाले असावे. याचसोबत त्यांना काही वर्ष कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे. BPSC सहाय्यक भरती २०२४ साठी जे उमेदवार अर्ज दाखल करणार आहे. त्यांचे वय ४५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. तर मागासवर्गीय लोकांसाठी वयाची अट ४८ वय असावे. राज्यातील SC/ST प्रवर्गातील लोकांचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त नसायला हवे.

निवड प्रक्रिया

सहाय्यक प्राध्यापक पदाच्या निवडीसाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाहीये. यासाठी निवड MBBS/MD/DAM मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे.

अर्ज

या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे. ही अर्ज भरण्यासाठी अनारक्षित श्रेणीतील लोकांना १०० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. तर अनुसूचित जाती आणि महिला उमेदवारांना फक्त २५ रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dnyanada Ramtirthkar: 'माझं पूर्ण नावं नीट ऐका...'; अभिनेत्री ज्ञानदा अडकली लग्नबंधनात, खास उखाणा घेत सांगितली सगळी लव्हस्टोरी

Maharashtra News Live Update: अशोक खरातला शिर्डीतील जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Sayali Sanjeev: साजिरं रुप तुझं दडलं मनात ग...

आधी गर्लफ्रेंडसोबत खटके उडाले, नंतर इन्स्टाग्रामवरून धमक्या आल्या अन्... कंटाळून तरुणाने आयुष्य संपवले

Weak heart signs: पायांमध्ये ही २ लक्षणं दिसली तर समजा तुमचं हृदय कमकुवत झालंय

SCROLL FOR NEXT