World Happiness Report Saam Tv
देश विदेश

World Happiness Report: आनंदी देशांची यादी जाहीर, फिनलंडने मारली बाजी; भारत कितव्या क्रमांकावर

Happiest Countries List 2026: जगाताली सर्वात आनंदी देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये सलग नवव्यांदा फिनलंड देशाने पहिला क्रमांक पटकावला. यावर्षीच्या यादीमध्ये भारत ११६ व्या क्रमांकावर आहे.

Priya More

Summary -

  • वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट 2026 जाहीर करण्यात आला

  • फिनलंड सलग नवव्यांदा पहिल्या स्थानावर

  • भारत ११६ व्या स्थानावर आहे

  • पाकिस्तानने भारताला मागे टाकले

जगातील आनंदी देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सर्वांत आनंदी देशांच्या यादीमध्ये फिनलंडने पहिला क्रमांक पटकावला आहे. संयुक्त राष्ट्राने जारी केलेल्या वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट २०२६ मध्ये फिनलंड देश नवव्यांदा सर्वात आनंदी देश ठरला आहे. तर या यादीमध्ये भारताने ११६ वे स्थान मिळवले आहे. एकूण १४७ देशांच्या यादीमध्ये पाकिस्तान १०४ क्रमांकावर आहे. पाकिस्तान देश हा भारतापेक्षा आनंदी देश ठरला आहे.

२०२५ मध्ये भारत सर्वात आनंदी देशांच्या यादीमध्ये ११८ व्या स्थानावर होता. तर यावर्षी भारत ११६ व्या क्रमांकावर आहे. महत्वाचे म्हणजे युद्धात अडकलेला इस्राइल देश आनंदी देशांच्या यादीमध्ये आठव्या स्थानावर आहे. या यादीमध्ये अफगाणिस्तान हा सर्वात कमी आनंदी देश ठरला आहे. तर जागतिक महासत्ता म्हणून मिरवणारा अमिरेका देश २३ व्या स्थानावर आहे. तर ब्रिटन २९ व्या, पॅनडा २५ व्या स्थानावर आहे.

वर्ल्ड हॅपिनेस अहवालाने यावर्षी सोशल मीडियाच्या प्रभावावर प्रकाश टाकला. कारण अनेक देश तरुण पिढीच्या सोशल मीडियाच्या वापरावर कायदेशीर निर्बंध लादत आहेत किंवा त्याबाबत विचार करत आहेत. वर्ल्ड हॅपिनेस अहवालानुसार, सोशल मीडियाच्या अती वापरामुळे अनेक देशांमधील तरुणांच्या आनंद आणि मानसिक स्थितीवर वाईट परिणाम होत आहे.

वर्ल्ड हॅपिनेस अहवालानुसार, २०२६ च्या जगातील सर्वात आनंदी देशांच्या यादीमध्ये पहिल्या दहा क्रमांकावर फिनलंड, आइसलँड, डेन्मार्क, कोस्टा रिका, स्वीडन, नॉर्वे, नेदरलँड्स, इस्रायल, लक्झेंबर्ग आणि स्वित्झर्लंड या देशांचा समावेश आहे. तर जगातील सर्वात दु:खी देशांमध्ये टांझानिया, इजिप्त, डीआर काँगो, लेबनॉन, येमेन, बोत्सवाना, झिम्बाब्वे, मलावी, सिएरा लिओन आणि अफगाणिस्तान या देशांचा समावेश आहे.

१४० देश आणि प्रदेशांमधील सुमारे १,००,००० नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या जीवनाचे मूल्यांकन करण्यास सांगितले असता त्यांनी दिलेल्या उत्तरांच्या आधारे देशांची क्रमवारी ठरवण्यात आली. हा अभ्यास गॅलप या विश्लेषण संस्थेच्या आणि यूएन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्कच्या मदतीने करण्यात आला. २०२६ च्या क्रमवारीनुसार सलग दुसऱ्या वर्षी इंग्रजी भाषिक देशांपैकी एकही देश पहिल्या १० मध्ये नाही. यावर्षीच्या आनंदी देशांच्या यादीमध्ये अमेरिका २३ व्या, कॅनडा २५ व्या आणि ब्रिटन २९ व्या स्थानावर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगड जिल्ह्यात वादळी पावसाने घेतला एक बळी

Konkan Tourism : कोकणात मामाच्या गावाला गेलाय? मग 'हा' स्वर्गाहून सुंदर समुद्रकिनारा एकदा पाहाच

भीषण अपघाताने संसार उद्ध्वस्त; बस-दुचाकीच्या धडकेत नवरा-बायकोचा जागीच मृत्यू

Crime News: बायकोचे दिव्यांग व्यक्तीसोबत संबंध, नवऱ्याने त्याला शेतात नेऊन दारू पाजली आणि...! 37 दिवसांनी उघड झालं चक्रावणारं सत्य

भारतीय रेल्वेचा नवा वेगवान चमत्कार! वंदे भारतने गाठला 180 kmph वेग; प्रवाशांचा किती वेळ वाचणार?

SCROLL FOR NEXT