India Tourism : नद्यांच्या संगमावर वसलाय किल्ला, पाण्याने वेढलेला 'हा' जलदुर्ग जपतोय शौर्याचा वारसा, एकदा भेट द्याच

Shreya Maskar

राजस्थान

राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यातील गागरोन किल्ला हा एक ऐतिहासिक जलदुर्ग आहे, जो आहू आणि काली सिंध नद्यांच्या संगमावर वसलेला आहे.

Rajasthan | yandex

गागरोन किल्ला

१२व्या शतकात बिजलदेव सिंग दोड यांनी बांधलेला गागरोन किल्ला युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आहे.

Gagron Fort | google

जलदुर्ग

गागरोन किल्ला हा टेकडी आणि पाणी अशा दोन्ही वैशिष्ट्यांनी नटलेला आहे. हा किल्ला 'गिरीदुर्ग' (डोंगरी) आणि 'जलदुर्ग' (पाण्याने वेढलेला) या दोन्ही वैशिष्ट्यांचा संगम आहे

Gagron Fort | google

वैशिष्ट्ये

गागरोन किल्ला तीन बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे. चौथ्या बाजूला एक मोठा खंदक आहे. येथील सौंदर्य तुमच्या मनाला रिफ्रेश करेल.

Gagron Fort | google

स्थापत्यशैली

गागरोन किल्ला राजपुताना स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. येथील कला पाहायला परदेशी पर्यटकही येथे गर्दी करतात.

Gagron Fort | google

राजस्थान पर्यटन स्थळे

राजस्थान येथे जयपूर, उदयपूर, जोधपूर, जैसलमेर, रणथंबोर नॅशनल पार्क, माउंट अबू अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत. तुम्ही येथे सुंदर फोटोशूट करू शकता.

Udaipur | google

कधी भेट द्यावी?

पावसाळ्यात आणि हिवाळ्यात राजस्थानला नक्की भेट द्या. येथे फॅमिली ट्रिप, मित्रांसोबत मजा-मस्ती करू शकता. हा किल्ला खूप कमी लोकांना माहितेय.

Gagron Fort | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Gagron Fort | google

NEXT : मालवणमध्ये लपलंय 'हे' सुंदर बेट, सौंदर्य पाहून परदेशातील मालदीव विसराल

Konkan Tourism | saam tv
येथे क्लिक करा...