Shreya Maskar
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण जवळील कालावली (गड नदीच्या खाडीत) वसलेले पाणखोल जुवा हे एक निसर्गरम्य बेट आहे. येथे तुम्ही वन डे पिकनिक प्लान करू शकता. मालवण तालुक्यातील हडी प्रदेशात असलेले सुंदर बेट आहे.
पाणखोल जुवा हे 'जुळे बेट' म्हणून ओळखले जाते. हे बेट नारळ-सुपारीच्या बागा, माडाची झाडे यांनी वेढलेले आहे. निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही येथे सुंदर फोटोशूट करू शकता.
पाणखोल जुवा या बेटावर हडी गावाची वाडी वसलेली असून, इथे सुमारे ३५ घरे आहेत. पाणखोल जुवा हे ठिकाण पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध आहे.
पाणखोल जुवा या जुळ्या बेटाला 'कोकणातील मालदीव' म्हटले जाते. तुम्हाला येथे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात थंड वातावरण अनुभवता येईल. संध्याकाळी येथे निसर्ग पाहायला मिळतो.
पाणखोल जुवा हे बेट चारी बाजूंनी पाण्याने वेढलेले असून येथे बोटीनेच जाता येते. तसेच येथे अनेक होमस्टे देखील उपलब्ध आहे. राहण्याची, खाण्याची येथे उत्तम सोय आहे.
पाणखोल जुवा बेटाजवळ तोंडवली-तळाशील समुद्रकिनारा आहे. येथे सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. तुम्ही येथे निवांत फेरफटका मारायला नक्की जा.
पाणखोल जुवा बेटावर संस्कृती आणि कोकणी जीवनशैली जवळून अनुभवता येते. येथे कोकणातील स्वर्गाहून सुंदर ठिकाण आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.