Shreya Maskar
बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर येथे भुईकोट किल्ला आहे, जो स्थानिक इतिहास आणि संरक्षणाचा साक्षीदार आहे. हा किल्ला ऐतिहासिक काळातील एक महत्त्वपूर्ण लष्करी ठाणे म्हणून ओळखला जातो.
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहराचा किल्ला १३ व्या शतकात बहामनी सुलतान मलिक खान याने वसवला होता. असे बोले जाते.
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहर नळगंगा नदीच्या काठी वसलेले आहे. नळगंगा नदी विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातून वाहते आणि मलकापूर हे या नदीकाठचे एक महत्त्वाचे शहर आहे.
मलकापूरचा किल्ला निजाम, मराठा आणि ब्रिटिश संघर्षाचा महत्त्वाचा साक्षीदार आहे. । येथे आजही तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात.
मलकापूर किल्ल्याची सद्यस्थिती- किल्ल्याचे अनेक भाग आता पडझड झाली आहे. तटबंदी व बुरुजांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर हे शहर 'विदर्भाचे प्रवेशद्वार' म्हणून प्रसिद्ध आहे. मलकापूर किल्ला हे ट्रेकिंगसाठी उत्तम ठिकाण होते.
बुलढाणा येथे अनेक पर्यटन स्थळे आहेत. यात लोणार सरोवर हे मुख्य आकर्षण आहे. तसेच येथे अंबाबरवा अभयारण्य देखील आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.