India Tourism : अरावली पर्वतरांगेत घडलाय इतिहास, 'हा' आहे मेवाडच्या पराक्रमाची साक्ष देणारा किल्ला

Shreya Maskar

राजस्थान

राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील अरवली टेकड्यांवर कुंभलगड किल्ला वसलेला आहे. कुंभलगड किल्ला हे महत्त्वाचे ऐतिहासिक ठिकाण आहे.

Kumbhalgarh Fort | google

कोणी बांधला?

कुंभलगड किल्ला हा १५ व्या शतकात राणा कुंभाने बांधलेला भव्य मेवाड किल्ला आहे. कुंभलगड किल्ला हा राजस्थानी आणि राजपूत वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे.

Kumbhalgarh Fort | google

जागतिक वारसा

कुंभलगड किल्ला हे युनेस्को (UNESCO) जागतिक वारसा स्थळ आहे. २०१३ मध्ये, 'राजस्थानचे डोंगरी किल्ले' या समूहाचा भाग म्हणून, हा किल्ला या यादीत समाविष्ट करण्यात आला.

Kumbhalgarh Fort | google

भारताची महान भिंत

कुंभलगड किल्ला आपल्या ३६ किमी लांबीच्या भव्य तटबंदीसाठी प्रसिद्ध आहे, ज्याला 'भारताची महान भिंत' म्हणून ओळखले जाते. १५ व्या शतकात महाराणा कुंभाने बांधलेली ही भिंत चीनच्या महान भिंतीनंतर जगातील दुसरी सर्वात लांब अखंड भिंत मानली जाते.

Kumbhalgarh Fort | google

अभेद्य किल्ला

कुंभलगड किल्ला हा मेवाडचा एक अभेद्य किल्ला होता. कुंभलगड किल्ला हा अरवली पर्वतरांगांतील १३ टेकड्यांनी वेढलेला आहे.

Kumbhalgarh Fort | google

किल्ल्याचे वैशिष्ट्ये

कुंभलगड किल्ल्यात सर्वात उंचावर बादल महल, ३०० हून अधिक जैन आणि हिंदू मंदिरे आहे. कुंभलगड किल्ल्याच्या तटबंदीला 'भारताची ग्रेट वॉल' असेही म्हणतात.

Kumbhalgarh Fort | google

राजस्थान पर्यटन स्थळे

राजस्थानमध्ये जयपूर, उदयपूर , जोधपूर, आणि जैसलमेर ही प्रमुख पर्यटन स्थळे आहेत. येथे तुम्हाला राजेशाही थाट अनुभवता येतो.

Kumbhalgarh Fort | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Fort | google

NEXT : लोणावळा-खंडाळा विसरा! मुंबईजवळचं 'हे' ठिकाण पाहिलंत का? एकदा जाल तर घरचा रस्ता विसराल

Mumbai Tourism | yandex
येथे क्लिक करा...