Shreya Maskar
नेहमी पिकनिक मध्ये हिल स्टेशन, धबधबे , उद्यान फिरण्यापेक्षा कधीतरी आपल्या ऐतिहासिक ठिकाणांची सफर देखील आवर्जून करा. किल्ल्यांमध्ये आपला इतिहास लपलेला आहे.
मध्य प्रदेश भारताच्या मध्यभागी वसलेले, विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत विसावलेले निसर्ग सौंदर्याने नटलेले राज्य आहे. या सौदर्यात इतिहास लपलेला आहे.
रेवा किल्ला हे मध्य प्रदेशातील रेवा शहरात वसलेले १७ व्या शतकातील एक ऐतिहासिक दुर्ग आहे, जे हिंदू आणि इस्लामिक वास्तुकलेच्या सुरेख संगमासाठी ओळखले जाते.
रेवा किल्ला 'राणी तलाव', 'बघेल संग्रहालय' 'दरबार हॉल' आणि 'भैरव बाबा मंदिर' यांच्या सानिध्यात स्थित आहे. ही भव्य वास्तू पाहायला परदेशी पर्यटक येथे नक्की येतात.
'टोन्स' नदीच्या काठावर रेवा किल्ला वसलेला आहे. रेवा किल्ला आजही आपला इतिहास जपत आहे. आयुष्यात एकदा तरी या ठिकाणाला नक्की भेट द्या.
रीवा किल्ल्याजवळची प्रसिद्ध पांढऱ्या वाघांची सफारी म्हणजे मुकुंदपूर व्हाईट टायगर सफारी आहे. ही जगातील पहिली पांढऱ्या वाघांची सफारी आहे.
मध्य प्रदेश हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाने नटलेले आहे. यात खजुराहोची मंदिरे, ग्वाल्हेरचा किल्ला, मांडूचा महाल, ओरछाचा किल्ला आणि भीमबेटकाची गुंफा ही ऐतिहासिक ठिकाणे आहेत.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.