Mandar Kiwale Case: पाच दिवसआधीच ठरला किवळेच्या हत्येचा प्लॅन; आरोपींचं पोलिसांनाच खुलं आव्हान

Mandar Kiwale Killed Outside Court : पुण्यात पुन्हा एकदा गँगवॉरनं डोकं वर काढलयं. भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी कोर्टाबाहेर मंदार किवळेची हत्या करण्याचा प्रयत्न झाला. या हल्ल्यानंतर किवळेनं जबाबात कोणते धक्कादायक खुलासे केलेत? आरोपींनी हल्ल्याआधीच पोलिसांना कसं आव्हानं दिलं होतं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Pune Gang War: Mandar Kiwale Attacked Outside Shivajinagar Court | Pune Crime News
Pune Gang War: Mandar Kiwale Attacked Outside Shivajinagar Court | Pune Crime News
Published On: 
Summary
  • पुण्यात पुन्हा एकदा गँगवॉरमधून हल्ल्याची घटना समोर आली.

  • शिवाजीनगर न्यायालयाबाहेर मंदार किवळेवर कोयत्याने वार करण्यात आले.

  • शुभम चव्हाणच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हल्ला झाल्याचा संशय.

हे रिल केलंय पुणे न्यायालयाबाहेर गोळीबार करणाऱ्या बब्या उर्फ ओमकार पवारनं. पाच दिवसांपूर्वीच्या या रिलमधून त्यानं थेट जामिनावर सुटलेल्या मंदार किवळेला इशारा दिला होता. बचके तू रेहना म्हणत बब्या आणि त्याचे साथीदार शुभम चव्हाणच्या हत्येचा बदला घेण्यासाठी किवळेवर लक्ष ठेवून होते...आणि अखेर शिवाजीनगर कोर्टाबाहेर संधी साधून मंदार किवळेला गाठलं आणि कोयत्यानं सपासप वार केले.या हल्ल्यात किवळेचे दोन्ही पंजे अक्षरक्ष: मनगटापासून वेगळे झाले. त्यानंतर किवळेनं जबाबावर उजव्या पायाच्या अंगठ्याचा ठसा उमटवत पोलिसांना काय सांगितलं...ऐका..

मंदार किवळेचा जबाब 'साम'वर

'तूच आमच्या शुभमला मारलं ना?' असं विचारत पिस्तूल चालवली, पण गोळी चुकली

गाडीवरील एकानं डोक्यात कोयते टाकण्यास सांगितलं आणि सपासप वार केले

शुभमच्या नावानं ओरडत हल्लेखोरांनी हवेत कोयते फिरवून दहशत माजवली

'शुभम दादा तुझ्या खुनाचा आम्ही बदला घेतला' असं ओरडत हल्लेखोर पळाले

'आम्हीच कात्रजचे राजे आहोत' असं म्हणत हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला.

Pune Gang War: Mandar Kiwale Attacked Outside Shivajinagar Court | Pune Crime News
Nashik Firing: राज्यात गोळीबाराच्या घटनांचे सत्र सुरूच; निफाडमध्ये गावठी कट्ट्यातून गोळीबार

हल्ल्याआधी रिल पोस्ट करून किवळेला इशारा देणाऱ्या आरोपींचा माज एवढा की हल्ल्यानंतरही बातम्यांमधील त्याचे कारनामे एडिट करून त्यांनी पुन्हा एक रिल बनवली. किंग ऑफ पुणे सिटी म्हणत या हल्लेखोरांनी पुणे पोलिसांनाच आव्हानं दिलं.

मुळात शुभम चव्हाणच्या खुनाचा बदला घेण्यासाठी अमोल चव्हाण आणि त्यांचे साथीदार गेल्या काही दिवसांपासून किवळेवर नजर ठेवून होते...येरवडा तुरुंगात असलेल्या किवळेला अमोल चव्हाण आणि त्यांचे साथीदार आपल्या हत्येचा कट रचत असल्याची खबर आधीच लागली होती. दरम्यान आता या हल्ला प्रकरणात

Pune Gang War: Mandar Kiwale Attacked Outside Shivajinagar Court | Pune Crime News
Knife Attack: जामा मस्जिद पोलीस ठाण्यात रक्तरंजित थरार! चाकू हल्ल्यात ५ पोलीस कर्मचारी जखमी, चेहरा आणि मानेवर सपासप वार

अमोल चव्हाण

गणेश चव्हाण

ऋषीकेश कोंडे

ओमकार उर्फ बब्या पवार

प्रथमेश येनपुरे

या पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आलीय. आता मंदार किवळेंनेच जबाब दिल्यामुळे पोलिसांना याप्रकरणाचा तपास करणं सोप्प झालयं...मात्र हत्येनंतर किंग ऑफ कात्रज, किंग ऑफ पुणे म्हणत आरोपींनी शेअर केलेल्या रिलमुळे कायदा सुव्यवस्थेचेच मात्र धिंडवडेेच निघालेत.

भररस्त्यात तेही कोर्टाबाहेर हत्या प्रकरणातील एका आरोपीवर कोयत्यानं हल्ला होत असताना पोलिस यंत्रणेला याची साधी खबर लागू नये? रिल्स बनवून आरोपी जर पोलिसांनाच डिवचत असतील तर ...एकूणच पोलिसांच्या या थंड कारभारामुळे पुणं आता बिहारच्या वाटेवर आहे का असच म्हणावं लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.