Knife Attack: जामा मस्जिद पोलीस ठाण्यात रक्तरंजित थरार! चाकू हल्ल्यात ५ पोलीस कर्मचारी जखमी, चेहरा आणि मानेवर सपासप वार

Knife Attack on Police Station in Delhi: पुराणी दिल्ली येथील जामा मशीद पोलीस ठाण्यात चौकशीदरम्यान एका व्यक्तीने पोलिसांवर चाकूने हल्ला केला. ज्यात पाच पोलीस कर्मचारी जखमी झालेत.
Delhi Crime News: Knife Attack At Jama Masjid Police Station, 5 Cops Injured
Delhi Crime News: Knife Attack At Jama Masjid Police Station, 5 Cops Injured
Published On: 
  • पुराणी दिल्लीतील पोलीस ठाण्यात चाकू हल्ल्याची घटना

  • दिल्लीमध्ये पोलिसांवर चाकूने हल्ला पाच कर्मचारी जखमी

  • चौकशीदरम्यान आरोपीने पोलिसांवर चाकूने हल्ला केला

पुराणी दिल्ली येथील जामा मशीद पोलीस ठाण्यात चौकशीदरम्यान एका व्यक्तीने पोलिसांवर चाकूने हल्ला केला. यात पाच पोलीस कर्मचारी जखमी झालेत. आरोपी नबीलचा पाठलाग करत पोलिसांनी चितली कबर परिसरातून अटक केलीय. पाठलाग करताना पोलिसांना गोळी झाडावी लागली.

आरोपीची ओळख नबील अशी पटलीय. चाकू हल्ला केल्यानंतर आरोपी घटना स्थळावरून पळून गेला. पोलीस स्टेशनच्या परिसरात असलेली एक दुचाकी घेत त्याने तेथून पोबारा केला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला चितली कबर परिसरात घेरले. तिथे त्याने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला; त्यावेळी पोलिसांनी आपल्या संरक्षणासाठी त्याच्यावर गोळीबार केला. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.

Delhi Crime News: Knife Attack At Jama Masjid Police Station, 5 Cops Injured
प्रसिद्ध ध्रुव राठी यांच्या अडचणी वाढल्या!; न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी,काय आहे प्रकरण?

पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास नबीलला जामा मशीद पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. हे बोलावणे त्याच्या आई आणि बहिणीशी संबंधित कौटुंबिक वादाच्या तक्रारीच्या संदर्भात होते. पोलीस ठाण्यात अधिकारी त्याच्याशी चर्चा करत असताना, त्याने अचानक चाकू काढून पोलिसांवर हल्ला केला. त्याने अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर आणि मानेवर वार केले, ज्यात पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले.

या घटनेनंतर पोलीस ठाण्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने संजीवनी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार मिळाल्यानंतर, त्यांची प्रकृती लक्षात घेता, त्यांना अधिक चांगल्या वैद्यकीय उपचारांसाठी सर गंगाराम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, हल्ला केल्यानंतर आरोपी पोलीस ठाण्यातून पळून गेला. पळून जाण्यासाठी त्याने वाटेत एक दुचाकी वाहन बळकावले. या घटनेची माहिती मिळताच मध्य जिल्ह्याच्या 'ऑपरेशन्स युनिट'चे पथक सक्रिय झाले आणि त्यांनी आरोपीचा शोध सुरू केला.

Delhi Crime News: Knife Attack At Jama Masjid Police Station, 5 Cops Injured
Pune : पुण्यात धक्कादायक घटना! माजी पोलिसाने महिलेसोबत गैरवर्तन केलं अन्...

पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करत 'चितली कब्र' परिसरात त्याला पकडलं. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने पुन्हा त्यांच्यावर हल्ला केला. यावर स्वसंरक्षणासाठी आणि त्याला नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस पथकाने गोळीबार केला आणि त्यानंतर त्याला ताब्यात घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.