Pune : पुण्यात धक्कादायक घटना! माजी पोलिसाने महिलेसोबत गैरवर्तन केलं अन्...

Pune News : पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरात धक्कादायक घटना. महिला रहिवाशासोबत गैरवर्तन आणि तिच्या पतीला मारहाण केल्याच्या आरोपावरून माजी पोलीस अधिकारी अभय परमार यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
pune former police officer abhay parmar
pune former police officer abhay parmarAI Image
Published On: 

सागर आव्हाड, पुणे

पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील मॉडेल कॉलनी येथे एका महिला रहिवाशासोबत गैरवर्तन केल्याचा आणि तिच्या पतीला मारहाण केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी माजी पोलीस अधिकारी अभय परमार याच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मॉडेल कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका महिलेसोबत अभय परमार याने गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. तसेच या घटनेदरम्यान महिलेच्या पतीलाही मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, अभय परमार यांची पोलीस खात्यातील कारकीर्दही यापूर्वी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.

pune former police officer abhay parmar
Gold Rate Today : सोन्याच्या दर घसरणीला ब्रेक! एक तोळ्यामागे १,४८० रुपयांची वाढ; वाचा आजचे ताजे दर

एप्रिल २०१८ मध्ये अहमदनगरमधील कोतवाली पोलीस ठाण्यात ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यावेळी केडगाव येथे शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची हत्या झाली होती. या घटनेनंतर कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यात झालेल्या कथित त्रुटींमुळे परमार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. पुढे या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली होती.

pune former police officer abhay parmar
Bank Closed : नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ४ दिवस बँका राहणार बंद, वाचा सुट्ट्यांची यादी

आता मॉडेल कॉलनीतील ताज्या घटनेमुळे अभय परमार पुन्हा चर्चेत आले आहेत. परिसरातील काही नागरिकांनीही त्यांच्या कथित वर्तनाबाबत नाराजी व्यक्त केली असून, नागरिकांना त्रास देणे, धमकावणे आणि आक्रमक वागणे अशा प्रकारांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन निष्पक्ष तपास करावा, अशी मागणी होत आहे. संबंधित महिला आणि तिच्या कुटुंबाला योग्य संरक्षण मिळावे, तसेच त्यांच्यावर कोणताही दबाव येऊ नये, याची काळजी घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. माजी पोलीस अधिकारी असो किंवा सामान्य नागरिक, कायदा सर्वांसाठी समान आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपांची सखोल चौकशी करून पुराव्यांच्या आधारे योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.