गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या बाजारात सातत्याने बदल होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आठवडाभरापूर्वी सोन्याच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, आता पुन्हा एकदा सोन्याच्या दराने उसळी घेतल्याने खरेदीदारांची चिंता वाढली आहे. विशेषतः लग्नसराईचा हंगाम जवळ येत असल्याने दागिन्यांची खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्या ग्राहकांना या दरवाढीचा फटका बसण्याची शक्यता आहे.
आजच्या बाजारभावानुसार, सोन्याच्या किमतीत प्रति तोळा १ हजार ४८० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे १० ग्रॅम सोन्याचा भाव १ लाख २६ हजार ५६० रुपयांवर पोहोचला आहे. दुसरीकडे, चांदीच्या बाजारातही गेल्या आठ दिवसांत मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले. मात्र, आज चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सध्या १०० ग्रॅम चांदीचा भाव १७ हजार ५०० रुपयांवर स्थिर आहे. एकूणच, सोन्याच्या दरातील वाढ आणि चांदीचे स्थिर भाव यामुळे सराफा बाजारातील पुढील घडामोडींकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १२,६५६
८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,०१,२४८
१० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,२६,५६०
१०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १२,६५,६००
१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ११,६००
८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ९२,८००
१० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,१६,०००
१०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर ११,६०,०००
१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ९,४९१
८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ७५,९२८
१० ग्रॅम सोन्याचे आजचे दर ९४,९१०
१०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर ९,४९,१००
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.