प्रसिद्ध ध्रुव राठी यांच्या अडचणी वाढल्या!; न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी,काय आहे प्रकरण?

Dhruv Rathee Faces Legal Trouble: दिल्लीच्या साकेत न्यायालयाने आज युट्युबर ध्रुव राठी यांच्याविरुद्ध २०१८ मधील फौजदारी मानहानीच्या प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ डिसेंबर २०२६ रोजी होणार आहे.
Dhurv Rathee In Trouble: Delhi Court Issues Non-bailable Warrant In Defamation Case
Dhruv Rathee 2018 criminal defamation case latest updatesaam tv
Published On: 
Summary
  • प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठी यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

  • २०१८ मधील मानहानी प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय

  • ध्रुव राठी मानहानी प्रकरणाची पुढील सुनावणी कधी होणार?

प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. सोमवारी, २३ नोव्हेंबर २०२६ रोजी, दिल्लीतील साकेत जिल्हा न्यायालयाने २०१८ मधील फौजदारी मानहानीच्या एका प्रकरणात ध्रुव राठी यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. न्यायिक दंडाधिकारी प्रथम श्रेणी अनम रईस खान यांच्या न्यायालयाने, तक्रारदार विकास पांडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हा आदेश दिलाय. न्यायालयाने या प्रकरणातील पुढील सुनावणी ३ डिसेंबर २०२६ रोजी होणार आहे.

काय आहे प्रकरण? वॉरंट का जारी करण्यात आले?

हा कायदेशीर वाद मे २०१८ मध्ये ध्रुव राठी याने यूट्यूबवर अपलोड केलेल्या एका व्हिडिओपासून सुरू झाला. ‘भाजप आयटी सेल भाग-२’ (BJP IT Cell Part-2) नावाच्या या व्हिडिओमध्ये राठीने असा आरोप केला होता की, भाजपच्या आयटी सेलने तक्रारदार विकास पांडे यांना लाच देण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान विकास पांडे यांनी या आरोपांना खोटे आणि निराधार असल्याचं म्हटलंय.

हे आरोप आपली प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने केल्याचा दावा त्यांनी केला आहे. विकास पांडे हे ‘आय सपोर्ट नरेंद्र मोदी’ (I Support Narendra Modi) या सोशल मीडिया पेजचे संस्थापक विकास पांडे यांनी ध्रुव राठीच्या विरोधात न्यायालयात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केलाय.

Dhurv Rathee In Trouble: Delhi Court Issues Non-bailable Warrant In Defamation Case
भाजपच्या महिला आमदाराला विषबाधा; व्हेंटिलेटरवर उपचार, प्रकृती चिंताजनक

न्यायालयाने कठोर भूमिका का घेतली?

न्यायालयाच्या नोंदींनुसार, याआधी दोनदा राठी यांच्याविरुद्ध समन्स आणि जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. मात्र ध्रुव राठी प्रामुख्याने जर्मनीमध्ये राहत असल्याने, त्यांना समन्स बजावण्यात आणि त्यांची न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थिती सुनिश्चित करण्यात अनेक वर्षांपासून अडचणी येत आहेत. दरम्यान ध्रुव राठी हे नुकतेच कॉकरोच जनता पार्टी' (CJP) द्वारे आयोजित एका आंदोलनात सहभागी होण्यासाठी भारतात आले होते. त्यानंतर ते ऑक्टोबर महिन्यात पुन्हा जर्मनीला परतले.

Dhurv Rathee In Trouble: Delhi Court Issues Non-bailable Warrant In Defamation Case
भाजप खासदाराच्या समर्थकांकडून NDAच्या आमदाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण; भर कार्यक्रमात कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

याआधी १२ ऑक्टोबर २०२६ रोजी न्यायालयाने शर्मांच्या वकिलांनी दाखल केलेला एक अर्ज स्वीकारला होता. या अर्जात प्रकरणाची सुनावणी जलद गतीने घेण्याची आणि राठी यांच्या नावे 'दस्ती' समन्स जारी करण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही राठी न्यायालयात हजर न राहिल्यामुळे, सोमवारी न्यायालयाने कठोर भूमिका घेत त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. या आदेशामुळे, ध्रुव राठी जर भारतात परतले, तर त्यांना अटक होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.