Malegaon Blast Case : महाराष्ट्रातील मालेगाव २९ सप्टेंबर २००८ रोजी बॉम्बस्फोटाने हादरलं. या प्रकरणाचा निकाल १७ वर्षांनी लागला. यावर मुंबईच्या विशेष एनआयए कोर्टाने निर्णय दिला. या प्रकरणात ६ लोकांचा मृत्यू तर १०० जखमी झाले होते. याच प्रकरणात माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना अटक केली होती.
प्रज्ञा सिंह ठाकूर या साध्वी प्रज्ञा या नावाने ओळखल्या जातात. त्या मध्य प्रदेशची राजधानी भोपाल पूर्व लोकसभा मतदारसंघाच्या खासदार राहिल्या होत्या. प्रज्ञा सिंह ठाकूर या महाविद्यालयीन काळापासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रिय होत्या. महाविद्यालयीन शिक्षणानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वेगवेगळ्या संघटनात सामील झाल्या.
प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात सहभाग नोंदवल्याचा आरोप होता. या प्रकरणात त्यांना अटक झाली होती. मालेगावातील जामा मशिदीजवळ झालेल्या स्फोटातील बाईक ही प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या नावावर होती. या प्रकरणात आरोग्याच्या कारणावरून जामीन मंजूर झाला होता.
दरम्यान, आरएसएस प्रचारक सुनील जोशी यांच्या हत्येचा आरोप त्यांचावर होता. २९ डिसेंबर २००७ रोजी सुनील जोशी यांची हत्या झाली होती. या प्रकरणात राजस्थानमधील एका व्यक्तीला ताब्यात घेतलं होतं. तर या प्रकरणी साध्वी प्रज्ञा यांच्यासहित ७ लोकांवर हत्येच्या कटात सामील झाल्याचा आरोप होता. मात्र, फेब्रुवारी २०१७ साली कोर्टाने सर्वांना निर्दोष मुक्त केलं.
साध्वी प्रज्ञा यांना २००८ साली स्तनाचा कर्करोग झाल्याचं निदान झालं. त्यानंतर २००८ साली कर्करोगावरील उपचारासाठी मास्टेक्टॉमी करण्यात आली. त्यांच्यावर स्तनाच्या कर्करोगावर दोनवेळा शस्त्रक्रिया करण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.