Malegaon Bomb Blast: मोठी बातमी! मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका

Malegaon Blast Verdict: मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची कोर्टाने निर्दोष सुटका केली आहे. १७ वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल कोर्टाने जाहीर केला आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली.
Malegaon Bomb Blast: मोठी बातमी! मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका
Malegaon Bomb BlastSaam TV
Published On

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल समोर आला आहे. या बॉम्बस्फोट प्रकरणातील सातही आरोपींची कोर्टाने निर्दोष सुटका केली. तब्बल १७ वर्षानंतर या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली. एनआयएच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सर्व आरोपी निर्दोष असल्याचे सांगितले. या प्रकरणात भोपाळच्या भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना मुख्य आरोपी बनवण्यात आले होते. प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सातही आरोपींची १७ वर्षांनंतर कोर्टाने निर्दोष सुटका केली.

एनआयएच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल जाहीर करताना सांगितले की, 'संशयाच्या आधारे आरोपींना शिक्षा देऊ शकत नाही. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या मालकीची दुचाकी होती हे तपासातून सिद्ध झालं नाही. दुचाकीचा चॅसी नंबरही रिकव्हर झाला नाही. ब्लास्ट स्कूटरमध्ये झाला हे देखील सिद्ध करता आले नाही. या प्रकरणाच्या तपासात अनेक त्रुटी आहे. पंचनामा योग्य झाला नव्हता. जागेवरून हाताचे ठसे जप्त करण्यात आले नव्हते.'

Malegaon Bomb Blast: मोठी बातमी! मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका
Malegaon : बनावट जन्म दाखला प्रकरणी चौथा गुन्हा दाखल; महापालिका प्रभाग अधिकाऱ्यांसह दोघांना अटक

न्यायालयाने पुढे असे देखील सांगितले की, 'मालेगावमध्ये स्फोट झाल्याचे सरकारी वकिलांनी सिद्ध केले. पण दुचाकीमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता हे सिद्ध करण्यात ते अपयशी ठरले. एटीएस आणि एनआयएच्या आरोपांमध्ये खूप फरक आहे. प्रसाद पुरोहितांनी बॉम्ब बनवला आणि पुरवल्याचा कोणताही पुरावा नाही. प्रत्यक्षदर्शिंनी देखील त्यांचे जबाब बदलले होते.'

Malegaon Bomb Blast: मोठी बातमी! मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका
Malegaon Bomb Blast: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज निकाल, प्रज्ञासिंहसोबत सातही आरोपींचं काय होणार?

मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींना संशयाचा फायदा झाला. या प्रकरणात भाजपच्या नेत्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी या सातही आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली. न्यायालयाच्या निकालानंतर, या प्रकरणातील सर्व आरोपी भावुक झाले. 'आमचा १७ वर्षांनंतर पुनर्जन्म झाला.', असे म्हणत या प्रकरणातील आरोपी समीर कुलकर्णी भावुक झाले.

Malegaon Bomb Blast: मोठी बातमी! मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका
Malegaon Bomb Blast: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज निकाल, प्रज्ञासिंहसोबत सातही आरोपींचं काय होणार?

दरम्यान, मालेगावमधील भिक्खू चौकातील मशिदीजवळ २९ सप्टेंबर २००८ ला हा बॉम्बस्फोट झाला होता. रात्री ९.३५ वाजता हा बॉम्बस्फोट करण्यात आला होता. त्यावेळी रमजानचा महिना सुरू होता. मशिदीजवळच्या एका मोटरसायकवर ठेवलेल्या स्फोटकांद्वारे हा बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला होता. यामध्ये ६ निष्पाप मुस्लिम नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर १०१ जण जखमी झाले होते. बॉम्बस्फोटाच्या या घटनेनंतर अनेक कुटुंबं उध्वस्त झाली होती.

Malegaon Bomb Blast: मोठी बातमी! मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका
Court Attack : कोर्टावर दहशतवादी हल्ला; 8 जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com