Court Attack : कोर्टावर दहशतवादी हल्ला; 8 जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ

iran court attack : इराणच्या कोर्टावर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात पाच नागरिकरांचा मृत्यू झाला आहे.
Court Attack update
Court Attack :Saam tv
Published On
Summary

इराणच्या कोर्टावर दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला.

हल्ल्यात ५ नागरिक आणि ३ दहशतवादी ठार झाले आहेत.

या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैश अल-जुल्म या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.

इराणच्या इस्लामिक रिवोल्यूशन गार्ड्सने तातडीने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

इराणच्या कोर्टावर शस्त्रधारकांनी दहशतवादी हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. शस्त्रधारकांनी केलेला हा हल्ला दहशतवादी हल्ला असल्याचं बोललं जात आहे. या हल्ल्यात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. हल्लेखोरांनी ग्रेनेड हल्ला केला. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.

Court Attack update
Beed Shocking : तरुण डॉक्टरची इंजेक्शन घेऊन आत्महत्या; बीडमध्ये खळबळ

इराणमध्ये कोर्टावर झालेल्या हल्ल्यात १३ जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी जैश अल-जुल्म या संघटनेने घेतली आहे. इराणने या संघटनेला दहशतवादी संघटना घोषित केलं आहे. कोर्टाच्या परिसरात घुसून दहशतवाद्यांनी नागरिकांवर गोळीबार सुरु केला. या घटनेने कोर्ट आवारातील निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. तर काही जण जखमी झाले.

Court Attack update
Congress Leader Dies : काँग्रेस नेत्याचा भीषण अपघातात जागीच मृत्यू; राजकीय वर्तुळात हळहळ

इराणच्या इस्लामिक रिवोल्यूशन गार्ड्स कोरने सांगितलं की, 'सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

Court Attack update
Maharashtra Politics : दहा वर्षे केंद्रात कृषीमंत्री, सहकारासाठी योगदान काय? विखे पाटलांची नाव न घेता शरद पवारांवर टीका

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमेलगतचा हा दहशतवादी समूह ड्रग्सच्या तस्करी करत आहे. या दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम इराणच्या सुरक्षा दलाकडून केलं जात आहे. ऑक्टोबर महिन्यात इराण पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी १० पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. सिस्तान आणि बलूचिस्तान प्रांत हा इराणमधील सर्वात मागास भागांपैकी एक मानला जातो. हा भाग सुन्नी मुस्लिम बहुल आहे. या भागातील सुन्नी आणि इराणमधील शिया समुदाय यांच्यातील संबंध दीर्घकाळापासून तणावपूर्ण आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com