Congress Leader Dies : काँग्रेस नेत्याचा भीषण अपघातात जागीच मृत्यू; राजकीय वर्तुळात हळहळ

Congress Leader Dies in Accident : काँग्रेस नेत्याचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झालाया. त्यांच्या मृत्यूने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.
jaipur accident
congress leader accident Saam tv
Published On
Summary

जयपूरच्या श्यामनगर येथे झालेल्या अपघातात काँग्रेस नेते मुकेश सांखला यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.

काँग्रेस नेत्याची कार अपघाताच्या वेळी हॉटेलबाहेर उभी होती.

या अपघातात कृष्णा सांखला गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सोशल मीडियावरून मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला.

Congress Leader dies in accident : जयपूरच्या श्यामनगर भागात गुरुवारी रात्री उशिरा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात बालेसर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मुकेश सांखला (३५ वय) आणि त्यांचा मित्र दलाराम माली (३०) यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. तर कृष्णा साखलवा हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे.

jaipur accident
Tragic Accident : मुसळधार पावसाचा फटका, शाळेचं छत कोसळून मोठी दुर्घटना,६ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश सांखला हे मित्र दलाराम माली, कृष्ण सांखला आणि कबाराम सांखला यांच्यासोबत दिल्लीला परतत होते. जयपूरच्या सोडाला श्यामनगर येथे हॉटेलच्या बाहेर त्यांची कार उभी होती. त्याचवेळी भरधाव वेगात असलेल्या कारने त्यांच्या कारला धडक दिली. या भीषण अपघातात रस्त्यावर उभे असलेल्या इतर कारचे देखील नुकसान झालं आहे.

jaipur accident
Pune News : पुणेकरांसाठी मोठी बातमी! मुसळधार पावसामुळे ब्रिटीशकालीन धरण ९२ टक्के भरलं, पाणीचिंता मिटणार?

तर या अपघातात कारमध्ये मागच्या सीटवर बसलेले मुकेश सांखला आणि दलाराम माली यांचा जागीच मृत्यू झाला. तर कृष्णा सांखला हे जखमी झाले. तसेच कबाराम सांखला किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच हॉटेलमधील कर्मचारी आणि स्थानिक लोक मदतीला धावले. अपघातातील जखमी कृष्णा यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

jaipur accident
Husband Wife Clash : बायको बॉयफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये, अचानक नवऱ्याची एन्ट्री; पुढे काय घडलं? वाचा

अपघाताची माहिती मिळताच पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तातडीने मृतदेह ताब्यात घेत शवगृहात ठेवण्यात आलं आहे. पोलिसांनी या अपघाताची माहिती अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांना दिली. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक रात्रीच भेटीसाठी रवाना झाले. पोस्टमार्टमची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात येणार आहे.

जयपूरमधील दुर्घटनेवर माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी दु:ख व्यक्त केलं. गहलोत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या कुटुबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com